आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL : केकेआरसमोर वॉरियर्स 106 धावांवर गारद

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - आयपीएल-6 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सने गुरुवारी पुणे वॉरियर्सला 46 धावांनी पराभूत केले. एल. बालाजी (3/19), अब्दुल्ला (2/26), जॅक कॅलिस (2/27) व नारायण (2/12) यांनी केकेआरला विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या टीमने 6 बाद 152 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात यजमान पुणे वॉरियर्सने अवघ्या 106 धावा काढून पराभव पत्करला. पुणे संघाला 11 व्या पराभवाला सामोरे जावे लागले. अर्धशतक ठोकणारा केकेआरचा गौतम गंभीर सामनावीर ठरला.


तत्पूर्वी कोलकाता नाइट रायडर्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कोलकात्याची सुरुवात चांगली झाली. कर्णधार गौतम गंभीर आणि मनविंदर बिस्ला यांनी पहिल्या विकेटसाठी 45 धावा जोडल्या. बिस्ला (12) बाद झाल्यानंतर पुढच्या चार विकेट 100 च्या आत गारद झाल्या. गंभीरने 50 धावा काढल्या. मात्र, जॅक कॅलिस (2), इयान मोर्गन (15) यांनी निराशा केली. हॉलंडचा खेळाडू रेयॉन टेन डोश्चेटने संकटाच्या वेळी 31 धावा काढून संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. अष्टपैलू क्रिकेटपटू युसूफ पठाणने (3) पुन्हा एकदा निराश केले. मनोज तिवारी (15) आणि रजत भाटिया (13) नाबाद राहिले. पुणे वॉरियर्सकडून वेगवान गोलंदाज भुवनेश्वरकुमारने 25 धावांत 3 विकेट, तर मिशेल मार्शने 7 धावांत 2 विकेट घेतल्या.


संक्षिप्त धावफलक
कोलकाता : 6/152 वि.वि. पुणे : सर्वबाद/106