आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CWG : पुरुष हॉकी लढतीमध्‍ये भारताला रौप्‍य, ऑस्‍ट्रेलियासोबत 4-0 ने पराभूत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्लासगो - आठ वेळचा ऑलिम्पिक चॅम्पियन भारतीय हॉकी संघाला या वेळीसुद्धा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदकच मिळाले. दिल्ली राष्ट्रकुलमध्येही भारतीय हॉकी संघाने रौप्यपदक जिंकले होते. या वेळी सुवर्णाची आशा होती. मात्र तसे होऊ शकले नाही. रविवारी फायनलमध्ये गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने भारताचा 4-0 अशा फरकाने पराभव केला. यापूर्वी, ऑस्ट्रेलियाने 2010 मध्ये दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत अंतिम सामना जिंकला होता.

इंग्लंडला कांस्यपदक
इंग्लंडच्या पुरुष संघाने कांस्यपदक पटकावले. तिसर्‍या स्थानासाठी झालेल्या लढतीत इंग्लंडने पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 ने न्यूझीलंडचा पराभव केला. निर्धारित वेळेपर्यंत ही लढत 3-3 ने बरोबरीत रंगली.