आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE Punjab Vs Kolkata Ipl 7 Qualifier Match Score In Marathi

IPL-7: कोलकात्‍याने बलाढ्य पंजाबवर 28 धावांनी मिळविलेल्‍या विजयासह अंतीम सामन्‍यात केला प्रवेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता- इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) सातव्या सत्रातील पहिल्या क्वॉलिफायनल सामन्यात कोलकाता नाइटरायडर्स संघाने पंजाब किंग्ज इलेव्हनसमोर विजयासाठी सात विकेटच्या मोबदल्‍यात 164 धावाचे आव्हान ठेवले. प्रतित्‍युत्‍तरादाखल पंजाबला 135 धावांपर्यंतच मजल मारता आली. कोलकात्‍याचा 28 धावांनी विजय झाला.
पंजाबला पहिला झटका उमेश यादवने दुस-या षटकामध्‍ये वीरेंद्र सेहवागला बाद केले. सेहवाग फक्‍त दोन धावा काढून पेव्हिलियनमध्‍ये परतला. . त्यानंतर मनन वोहरा बाद झाला.

पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्‍याचा निर्णय घेऊन कोलकाताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. कोलकाताने निर्धारित20 षटकात 163 धावा केल्या. उथप्पाने (42) सर्वाधिक धावा केल्या.

दरम्यान, 15 व्या षटकाचा चौथा चेंडू फेकून झाल्यानंतर अचानक पाऊस सुरु झाला. त्यामुळे पंजाबविरुद्ध कोलकाता लढत थांबवण्यात आली होती. पाऊस थांबताच लढत पुन्हा सुरु झाल्यानंत सूर्यकुमार यादव आणि डुशेट यांनी शानदार फटकेबाजी केली. मात्र करनवीर सिंहच्या चेंडूवर यादव आऊट झाला. यादव याने 20 धावा केल्या. डुशेटला मिचेल जॉनसनने बाद केले . डुशेट याने 17 धावा केल्या.

करनवीर सिंह याने एकाच षटकात शाकिब अल हसनसह (18) यूसुफ पठाण(20)ला तंबूत पाठवले. क्रिजवर रेयान टेन डुशेट आणि सूर्यकुमार यादव खेळत आहे.
दूसर्‍या षटकात मिचेल जॉनसनने कोलकाता संघाला पहिला झटका दिला. कर्णधार गौतम गंभीर उचलून खेळण्याच्या नादात जॉर्ज बेलीने अलगद झेल घेतला. गंभीरला केवळ एक धाव काढून तंबूत परतावे लागले.

त्यानंतर रॉबिन उथप्पाने मनीष पांडेसोबत डाव सावरला. या दोघांनी 65 धावांची भागेदारी केली. अक्षर पटेलने आठव्या षटकात उथप्पा आणि पांडे दोघानाही तंबूत परत पाठवले. रॉबिन उथप्पाने 42 तर मनीष पांडेने 21 धावा काढल्या.

पंजाब संघात कोणताही बदल करण्‍यात आले नाही. कोलकाता संघा एकमेव बदल करण्‍यात आलेला आहे. विनयकुमारच्या बदल्यात पीयूष चावलाला संधी देण्यात आली आहे.
दरम्यान, आयपीएलच्या क्वालिफायरचा पहिला सामना मंगळवारी होणार होता. मात्र, पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना एक दिवस स्थगित करून बुधवारी आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
संघ पुढीलप्रमाणे...
पंजाब - वीरेंद्र सेहवाग, मनन वोहरा, रिद्धिमान साहा, ग्लेन मॅक्सवेल, डेव्हिड मिलर, कर्णधार जॉर्ज बेली, अक्षर पटेल, मिचेल जॉनसन, ऋषी धवन, करनवीर सिंह आणि परविंदर अवाना.

कोलकाता - कर्णधार गौतम गंभीर, रॉबिन उथप्पा, मनीष पांडे, यूसुफ पठान, शाकिब अल हसन, रेयान टेन डुशेट, सूर्यकुमार यादव, पीयूष चावला, मॉर्ने मॉर्केल, उमेश यादव आणि सुनील नारायण.

सामन्‍यादरम्‍यानची छायाचित्रे पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा...