आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE Rajasthan Royals Vs Kings Xi Punjab Match Score In Marathi

IPL-7: पंजाब किंग्जचा राजस्थानवर 16 धावांनी रॉयल विजय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड- यजमान किंग्ज इलेव्हन पंजाबने शुक्रवारी आयपीएल-7 मध्ये राजस्थान रॉयल्सवर 16 धावांनी विजय मिळवला. अक्षर पटेल (3/24), ऋषी धवन (2/25) आणि करणवीर सिंग (2/16) यांच्या धारदार गोलंदाजीच्या बळावर पंजाबने सामना जिंकला. पंजाबचा आयपीएलमधील हा दहावा विजय ठरला. राजस्थानचा सहावा पराभव ठरला.

प्रथम फलंदाजी करताना किंग्ज इलेव्हन पंजाबने चार बाद 179 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सला आठ गड्यांच्या मोबदल्यात 163 धावा काढता आल्या. धावांचा पाठलाग करणार्‍या राजस्थानकडून जेम्स फ्युकनरने सर्वाधिक 35 धावांची खेळी केली. संजू सॅमसनने 30, हॉग्जने 31 धावांची केलेली खेळी व्यर्थ ठरली. अक्षर पटेलने 24 धावा देत शानदार तीन बळी घेतले. तत्पूर्वी पंजाबला वीरेंद्र सेहवाग (18) आणि मनन वोहरा (25) यांनी चांगली सुरुवात करून दिली. जॉर्ज बेली (26) आणि मिलरने (29) अभेद्य 60 धावांची भागीदारी करून पंजाबला सन्मानजनक धावसंख्या उभी करून दिली.

संक्षिप्त धावफलक : पंजाब : 4 बाद 179 धावा, राजस्थान : 8 बाद 163 धावा.