आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE RCB Vs KKR Ipl Match News Latest Score In Marathi

IPL-7: सुनील नरेनच्‍या \'फिरकी\'ने कोलकात्‍याचा शानदार विजय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकात्‍याने दिलेल्‍या 196 धावांचा डोंगर पार करताना विराट कंपनी 20 षटकामध्‍ये 5 खेळाडुच्‍या मोबदल्‍यात 165 धावाच करु शकली. सुनील नरेनच्‍या शानदार गोलंदाजीच्‍या बळावर आणि फलंदाजांनी केलेल्‍या उत्‍कृष्‍ट प्रदर्शनाने कोलकात्‍याने विराट टीमचा 30 धावांनी पराभव केला.
नरेनची भेदक गोलंदाजी
कोलकात्‍याचा फिरकीपटू सुनील नरेनने आपल्‍या फिरकीच्‍या तालावर विराट कंपनीला नाचविले. त्‍याने महत्‍वाच्‍या चार विकेट टिपल्‍या. त्‍यामध्‍ये ताकवाले, विराट कोहली, युवराजसिंह आणि एबी डिविलिअर्सचा समावेश आहे.
ऑरेंज कॅपचा मानकरी
कोलकाताच्‍या रॉबिन उथप्‍पाने चांगली खेळी केली असून अर्धशतकासह आयपीएल-7 मध्‍ये सर्वांधीक धावा करुन ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे. यापूर्वी किंग्‍ज इलेव्‍हन पंजाबच्‍या ग्‍लेन मॅक्‍सवेलकडे ऑरेंज कॅप होती.

उभय संघ
कोलकाता - कर्णधार गौतम गंभीर, रॉबिन उथप्पा, मनीष पांडे, शाकिब अल हसन, यूसुफ पठान, रेयान टेन डुशेट, सूर्यकुमार यादव, आर विनय कुमार, मॉर्ने मॉर्केल, उमेश यादव आणि सुनील नरेन

बंगळुरु -
ख्रिस गेल, योगेश टाकवाले, कर्णधार विराट कोहली, युवराज सिंह, एबी डिविलियर्स, सचिन राणा, मिचेल स्टार्क, अबू नेचिम, अशोक डिंडा, युजवेंद्र चहल आणि मुथैया मुरलीधरन
सामन्‍यादरम्‍यानची छायाचित्रे पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा..