अॅडिलेड - ओव्हल स्टेडियमवर सुरु असलेल्या कसोटी समान्याच्या दुसर्या दिवसाचा खेळ संपला. ऑस्ट्रेलियाने 7 विकेट गमावत 517 रन्स केले आहेत. क्रिजवर मिशेल जॉन्सन आणि स्टिव्हन स्मिथ आहे. कर्णधार मायकेल क्लार्क (128) शतक ठोकून बाद झाला. स्मिथसह त्याने 163 रन्सची भागीदारी केली. स्मिथने नाबाद 168 रन्सची शानदार खेळी केली.
अॅलन बॉर्डर आणि स्मिथचा विक्रम मोडला
क्लार्कने कारकीर्दीतील 28 वे शतक आज पूर्ण केले. त्याने सर्वाधिक शतकांचे ऑस्ट्रेलियन दिग्गज अॅलन बॉर्डर आणि साऊथ आफ्रिकेचा स्टार ग्रीम स्मिथ यांचे विक्रम मोडले आहे. बॉर्डर आणि स्मिथ यांनी कसोटीत 27 शतक केले होते.
सामन्याच्या पहिल्या दिवशी रिटायर्ड हर्ट होऊन तंबुत परतलेला कर्णधार क्लार्क आज फार्मात होता. 60 रन्सहून पुढे खेळताना क्लार्कने आज शतक ठोकले. स्मिथची त्याला चांगली साथ मिळाली. स्टिव्हन स्मिथने 150 रन्स केले आहे. पावसामुळे खेळात व्यत्यय आला.
सामन्याच्या पहिल्या दिवशी यजमान संघाचा कर्णधार क्लार्क 60 रन्सवर रिटायर्ड हर्ट झाला होता. संघाची धावसंख्या वाढत नाही, असे दिसत असल्यामुळे त्याने आज पुन्हा मैदानात उतरुन बॅटींग करण्याचा निर्णय घेतला.
पावसामुळे सामना सुरु होण्यास उशिर
पहिल्या दिवस अखेर ऑस्ट्रेलियाने 6 बाद 354 रन्स केले होते. स्टिव्हन स्मिथ 72 वर नाबाद होता.
फोटो - मायकेल क्लार्क आणि स्टिव्हन स्मिथ
पुढील स्लाइडमध्ये, क्लार्क जखमी, तरीही मैदानात