आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Live Score Ind Vs Aus Adelaide Test Match Day 3 In Marathi

कसोटी 3rd Day: पहिल्या सामन्यात शतक झळकावणारा कोहली ठरला चौथा कर्णधार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅडिलेड - ओव्हल स्टेडियमवर सुरु असलेल्या कसोटीच्या तिसर्‍या दिवसावर टीम इंडियाचे नाव कोरले गेले. कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळी करत संघाला मजबूत स्थितीत पोहोचविले. त्याच्या शतकाच्या जोरावर संघाने तिसर्‍या दिवस अखेर 5 विकेट गमावत 369 रन्स केले. रोहित शर्मा (33) आणि रिध्दीमान सहा (1) नाबाद आहेत. ऑस्ट्रेलियाने त्यांचा पहिला 517 रन्सवर घोषित केला त्यापासून टीम इंडिया 148 रन्सने पिछाडीवर आहे. भारताकडे अजून पाच विकेट देखील शिल्लक आहेत.

विराट कोहलीने शानदार खेळी करुन फॉलोऑनचे संकट टाळले. मिशेल मार्शच्या गोलंदाजीवर त्याने शतक पूर्ण केले. त्याचे कारकीर्दीतील सातवे आणि कर्णधार म्हणून पहिले शतक आहे. कोहलीने डाव सावरला होता. तिसर्‍या दिवसाचा सामना संपायला केवळ तीन ओव्हर शिल्लक असताना मिशेल जॉन्सनने त्याला बाद केले. कोहली 115 रन्सवर बाद झाला.

कर्णधार कोहलीचे शानदार शतक
विराट कोहलीने अॅडिलेड येथे शतक झळकावून एक विक्रम प्रस्थापित केला आहे. कर्णधार म्हणून खेळत असताना पहिल्याच कसोटीत शतक झळकवणारा तो चौथा भारतीय कर्णधार ठरला आहे. याआधी विजय हजारे, दिलीप वेंगसरकर आणि सुनील गावसकर यांनी ही कमाल करुन दाखविली आहे.
एवढेच नाही, तर 47 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियामध्ये कर्णधारमधून खेळी करताना भारतीय खेळाडूने एवढे चांगले प्रदर्शन केले आहे. 1967 च्या डिसेंबरमध्ये अॅडिलेड कसोटीत चंदू बोर्डे यांनी 67 रन्सची खेळी केली होती.

राहाणे बाद
नाथन लियॉनच्या फिरकी गोलंदाजीचा अजिंक्य राहाणे बळी ठरला. त्याने कोहलीसोबत संघाचा डाव चांगला सावरला होता. मात्र, 76 व्या ऑव्हरमध्ये त्याने चुकीचा चेंडू टोलावून शेन वॉटसनकडे सोपा झेले दिला. राहाणेने 10 चौकारांनी सजलेली 62 रन्सची खेळी केली. त्याने कोहलीसोबत चौथ्या विकेटसाठी 101 रन्सची भागीदारी केली.
चेतेश्वरने संयमीत फलंदाजीचे प्रदर्शन करत अर्धशतक पूर्ण केले, मात्र त्याला शतक पूर्ण करता आले नाही. नाथन लियॉनच्या गोलंदाजीवर तो क्लिन बोल्ड झाला. कर्णधार कोहलीला त्याने चांगली साथ दिली. पुजाराने 9 चौकारांच्या मदतीने 73 रन्स केले. विराटसोबत त्याने 81 रन्सची भागीदारी केली.
विराटला लागला बाऊन्सर, जॉन्सन घाबरला
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचे मैदानावर बाऊन्सरने स्वागत झाले. मुरली विजयला बाद केल्यानंतर जॉन्सनने कोहलीला बाऊन्सर टाकला. विराट त्यापासून वाचण्यासाठी खाली वाकला, मात्र तरीही त्याचा टायमिंग चुकला आणि बॉल त्याच्या डोक्यावर लागला. बॉल लागता क्षणी मिशेल जॉन्सनसह ऑस्ट्रेलियाचे सर्व खेळाडू घाबरले. त्यांनी सर्वांनी कोहलीची विचारपूस केली आणि तो व्यवस्थित असल्याची खात्री पटल्यानंतर त्यांचा जीव भांड्यात पडला. गेल्या महिन्यात 27 तारखेला ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर फिलिप ह्यूजचे बाऊन्सर लागल्याने निधन झाले होते. त्या दुःखातून अजूनही ऑस्ट्रेलियाचे खेळाडू सावरलेले नाहीत.
अर्धशतकानंतर मुरली विजय बाद
टीम इंडियाला दुसरा झटका मिशेल जॉन्सनने दिला. त्याने मुरली विजयला विकेटकिपर ब्रँड हॅडिनकरवी झेल बाद केले. विजयने 3 चौकार, 2 षटकारांच्या मदतीने 53 रन्स केले. विजयने पुजारासोबत दुसर्‍या विकेटसाठी 81 रन्सची भागीदारी केली.

ऑस्ट्रेलियाने 517 धावांवर केला डाव घोषित
पहिल्या कसोटीत यजमान ऑस्ट्रेलिया संघ मजबूत स्थितीत पाेहोचला आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार मायकेल क्लार्क (128) आणि स्टीव्हन स्मिथ (नाबाद 162) यांनी शतके ठोकताना संघाची धावसंख्या बाद 517 धावांपर्यंत पोहोचवली. या दोन्ही फलंदाजांनी शतके ठोकल्यानंतर आपला दिवंगत सहकारी फिलिप ह्यूजचे स्मरण करताना आकाशाकडे बघून बॅट उंचावत आपले हे शतक त्याला समर्पित केले. क्लार्कचे हे 28 वे, तर स्मिथचे हे पाचवे कसोटी शतक आहे. या दोघांनी सातव्या विकेटसाठी 163 धावांची भागीदारी करून सामन्याचे चित्र बदलले. पावसामुळे खेळात व्यत्यय जरूर आला. मात्र, ऑस्ट्रेलियाने वेगवान खेळ करून पाचशे धावांचा टप्पा ओलांडला.

क्लार्कचे भारताविरोधात 2000 रन्स
भारताविरुद्ध कसोटीत हजार धावांचा टप्पा गाठणारा क्लार्क (2042) रिकी पाँटिंगनंतर (2555) दुसरा ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला आहे. भारताविरुद्ध दोन हजारपेक्षा अधिक धावा काढणाऱ्या इतर देशांच्या फलंदाजांत क्लाइव्ह लॉइड (2344), जावेद मियाँदाद (2228) आणि शिवनारायण चंद्रपॉल (2171) यांचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलिया पहिला डाव
517/7 (घोषित)
फलंदाजी
डेव्हिड वॉर्नर - 145 रन
कर्णधार मायकेल क्लार्क - 128 रन
स्टिव्हन स्मिथ - 162* रन
गोलंदाजी
मोहम्मद शमी - 2/120
वरुण आरोन - 2/136
करण शर्मा - 2/143
इशांत शर्मा - 1/85
भारताचा पहिला डाव
369/5 (तिसर्‍या दिवस अखेर)
फलंदाजी
विराट कोहली - 115 रन
चेतेश्वर पुजारा - 73 रन
अजिंक्य रहाणे - 62 रन
मुरली विजय - 53 रन
शिखर धवन - 25 रन
रोहित शर्मा - 33* रन
गोलंदाजी
मिशेल जॉन्सन - 2/90
नाथन लियॉन - 2/103
रेयान हॅरिस - 1/49
भारत ऑस्ट्रेलियाने दिलेल्या लक्ष्याच्या 148 रन पिछाडीवर. 5 विकेट अजूनही शिल्लक.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, तिसर्‍या दिवसाच्या सामन्याची छायाचित्रे