आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE Score India Vs Sri Lanka 4th ODI Match At Kolkata News Update In Marathi

रोहित शर्माच्‍या झंझावाती \'द्विशतकी\' खेळीने भारताचा दणदणीत विजय!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- द्विशतक पूर्ण केल्यानंतर बॅट उंचावून अभिवादन करताना रोहित शर्मा)
कोलकाता- ऐतिहास‍िक ईडन गार्डन्सवर चौथ्या एकदिवसीय सामन्‍यामध्‍ये भारताने श्रीलंकेचा दारुण पराभव केला आहे. सलामीवीर रो‍हित शर्माच्‍या झंझावाती द्विशतकी खेळीने आणि धवल कुलकर्णीच्‍या भेदक गोलंदाजीच्‍या बळावर भारताने श्रीलंकेचा धुव्‍वा उडवत 153 धावांनी दणदणीत विजय मिळविला आहे.
श्रीलंकन संघ 43.1 षटकातच सर्वबाद झाला. भारताच्‍या 405 धावांच्‍या डोंगराचा पाठलाग करताना लंकन संघ 251धावाच काढू शकला .
अक्षर पटेलने कप्तान अँजेलो मॅथ्‍यूजला उथप्पाच्या मदतीने बाद केले. मॅथ्‍यूजने 75 धावा पूर्ण केल्या. धवल कुलकर्णीच्या गोलंदाजीने प्रसन्ना आणि कुलसेखराचा बळी घेतला.
स्वस्तात परतले 4 खेळाडू
405 धावांचे लक्ष्‍य गाठण्‍यासाठी उतरलेल्या श्रीलंकेची सुरुवात खराब राहिली.पहिल्या षटकात ओपनर कुशल परेराचा बाद झाला.30 धावा होताच स्टुअर्ट बिन्नीने क्रीजवर आलेल्या दिनेश चंडमलला बाद केले. त्याने फक्त 9 धावा केल्या. 9 व्या षटकात यादवने महेला जयवर्धनेला चालते केले. आपला मोर्चा टिकून 34 धावा करणा-या तिलकरत्ने दिलशान बिन्नीच्या चेंडूवर बाद झाला.
दरम्यान ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा याने शानदार द्विशतक (264) ठोकले. नुवान कुलसेखरा याने शर्माला सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर बाद केले. शर्माच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने श्रीलंकेला विजयासाठी 405 धावांचे आव्हान दिले आहे.
रोहित शर्माचे वर्ल्ड रेकॉर्ड...
रोहित शर्मा याने एकदिवसीय सामन्या दुसरे द्विशतक ठोकले आहे. तसेच 264 धावा करणारा पहिला फलंदाजाचा बहुमानही रो‍हित शर्माला मिळाला आहे. यापूर्वी रोहित शर्मा याने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिले द्विशतक ठोकले होते.

याशिवाय रोहित शर्मा याने वीरेंद्र सेहवाग याचा विक्रम मोडीत काढला आहे. वीरेंद्र सहेवाग याने 8 डिसेंबर 2011 मध्ये वेस्ट इंडिज विरोधात मध्य प्रदेशातील इंदूर येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात 219 धावा केल्या होत्या.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या टीम इंडियाची सुरुवात साधारण झाली. अजिंक्य रहाणे (28) सोबत रोहित यांने विकेटसाठी 40 धावांची भागिदारी केली. रहाणे श्रीलंकेंचेचा कर्णधार एंजेलो मॅथ्यूजच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू बाद झाला. नंतर क्रिजवर आलेला अंबाती रायुडुला (8) विशेष काही करता आले नाही. शमिंडा इरंगाने रायुडुचा त्रिफळा उडवला.

श्रीलंकाविरुद्ध खेळल्या जाणार्‍या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने 3-0 अशी आघाडी घेतली आहे.

टीम:
भारत: अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, कर्णधार विराट कोहली, सुरेश रैना, स्टुअर्ट बिन्नी, अक्षर पटेल, करन शर्मा, उमेश यादव आणि धवल कुलकर्णी.

श्रीलंका: एंजलो मॅथ्यूज (कर्णधार), कुशल परेरा, तिलकरत्ने दिलशान, प्रियंजन, दिनेश चंडीमल, महेला जयवर्द्धने, लाहिरु थिरिमाने, एरंगा, जीवन मेंडिस, थिसारा परेरा, नुवान कुलसेखरा.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, भारतविरुद्ध श्रीलंका सामन्याची छायाचित्रे...