आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Live Score Of Chennai Super Kings Vs Royal Challengers Ipl Match

अखेरच्‍या षटकात चेन्‍नईचा नाट्यमय विजय, आर. पी. सिंगचा \'नो-बॉल\' बंगळुरुला भोवला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्‍नई- अखेरच्‍या षटकापर्यंत रंगलेल्‍या सामन्‍यात चेन्‍नई सुपर किंग्‍सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर नाट्यमय विजय मिळविला. आर. पी. सिंगने टाकलेल्‍या 'नो-बॉल'मुळे बंगळुरुला सामना गमवावा लागला.

अखेरच्‍या चेंडुंवर चेन्‍नईला 2 धावांची गरज होती. त्‍यावेळी रविंद्र जडेजा स्‍टाईकवर होता. जडेजाने चेंडु कट केला. परंतु, तो थेट थर्डमॅवर उभ्‍या असलेल्‍या फिल्‍डरच्‍या हातात गेला. सामना जिंकल्‍याचा आनंद बंगळुरुच्‍या खेळाडुंनी सुरु केला. परंतु, दुस-याच क्षणाला त्‍यांना प्रचंड निराश व्‍हावे लागले. कारण पंचांनी हा चेंडू 'नो-बॉल' ठरविला होता आणि जडेजाने त्‍यावर 1 धाव काढली होती. त्‍यामुळे चेन्‍नईने सामना जिंकला. आर. पी. सिंगचा पाय क्रिझच्‍या खूप पुढे पडल्‍याचे रिप्‍लेमध्‍येही दिसून आले. ही चूक बंगळुरुला भोवली.

जडेजाची निर्णायक खेळी : चेन्नईला अखेरच्या 6 चेंडूंवर विजयासाठी 16 धावांची गरज होती. चेन्नईने हे लक्ष्य 5 चेंडूंतच पूर्ण केले. जडेजाने पहिल्या दोन चेंडूंवर अनुक्रमे चौकार आणि षटकार मारून सामना आवाक्यात आणला. जडेजाने 20 चेंडूंत नाबाद 38 धावा ठोकल्या. महेंद्रसिंग धोनी (33), एस. बद्रीनाथ (34) आणि सुरेश रैना (30) यांनीही विजयात योगदान दिले.
अखेरच्या षटकातील रोमांच
चेन्नईला अखेरच्या षटकात विजयासाठी 16 धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवर जडेजाने रुद्र्रला चौकार आणि दुसर्‍या चेंडूवर षटकार मारून तिसर्‍या चेंडूवर एक धाव घेतली. चौथ्या चेंडूवर मॉरिसने दोन धावा काढल्या. पाच चेंडूवर एक धाव निघाली. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी 2 धावांची गरज असताना जडेजाने एक धाव घेतली. मात्र, तो चेंडू नोबॉल असल्याने चेन्नईने रोमांचक विजय मिळवला.