आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Live Score Of Hydrabad Sunrisers Vs Royal Challengers Banglore In Ipl 6

\'सुपर\' सनरायझर्सचा बंगळुरुवर \'रॉयल\' विजय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - आयपीएल-6 मध्ये रविवारी यजमान सनरायझर्स हैदराबादने सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पाच धावांनी पराभव केला. सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने सहा चेंडूत 20 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात बंगळुरूला 15 धावा काढता आल्या. तत्पूर्वी, बंगळुरूने आठ गड्यांच्या मोबदल्यात 130 धावा काढल्या. हैदराबादने 7 गडी गमावून 130 धावा काढून सामना टाय केला.

हैदराबादकडून अक्षत रेड्डी (23) व हनुमा विहारीने नाबाद 44 धावा काढल्या. सलामीवीर पार्थिव (2) बाद झाला. प्रथम फलंदाजी करणार्‍या बंगळुरू संघाची सुरुवात निराशाजनक झाली. या सामन्यात सलामीवीर क्रिस गेल (1) व तिलकरत्ने दिलशान (5) दोघेही सपशेल अपयशी ठरले. गेलला हनुमा विहारीने पार्थिव पटेलकरवी झेलबाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. दिलशानला ईशांतने त्रिफळाचीत केले.

आठ धावांवर दोन गडी गमावणार्‍या बंगळुरूचा डाव कर्णधार विराट कोहली व एम. हेनरिक्सने सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी केली. यामध्ये तिसर्‍या क्रमांकावर आलेल्या कोहलीने 46 धावा काढल्या. त्याने 44 चेंडूत पाच चौकार व एक षटकार ठोकला. ऑस्ट्रेलियाच्या ऑलराउंडर हेनरिक्सने 40 चेंडूत पाच चौकारांच्या साह्याने 44 धावा काढल्या. त्याला ईशांतने शेवटच्या षटकात व्हाइटकरवी झेलबाद केले. हैदराबादच्या ईशांत शर्माने चार षटकात 27 धावा देत तीन बळी घेतले.