आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RCB vs CSK : चेन्नईचा बेंगळुरूवर सोपा विजय, नेहराचे 4 बळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळूर - महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वातील चेन्नईच्या संघाने बेंगळुरू रॉयल चॅलेंजर्सला सहज पराभूत केले. चेन्नईने बेंगळुरूसमोर 182 धावांचे आव्हान ठेवले होते. त्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बेंगळुरूला मोठी भागीदारी करता आली नाही. कोहलीने अर्धशतक केले. पण त्यालाही विजय साकारता आला नाही.
त्याआधी रैनाने केलेली फटकेबाजी पाहता चेन्नई 200 पेक्षा अधिक आकडा गाठणार असे वाटत होते. पण रैना बाद झाल्यानंतर चेन्नईच्या फलंदाजीला गळती लागली आणि धावांची गती अचानक कमी झाली. त्यामुळे धोनीच्या चेन्नईला अपेक्षित लक्ष गाठता आले नाही.
बेंगळुरूने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या चेन्नईला मॅक्कुलमच्या रुपात लवकरल पहिला धक्का बसला. चहलने त्याचा बळी घेतला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या रैनाने चांगली फटकेबाजी सुरू केली. त्याने स्मिथच्या साथीने चांगली भागीदारी केली. पण पटेलच्या गोलंदाजीवर स्मिथ बाद झाला.
स्मिथ बाद झाल्यानंतर धोनी लवकर फलंदाजीला आला. त्यामुळे चेन्नईचे इरादे मोठी धावसंख्या उभारायची असल्याचे स्पष्ट झाले. रैनाची फटकेबादी वारंवार त्यावर शिक्कामोर्तब करत होती. रैनाने चहलच्या एका षटकात सलग तीन षटकार खेटले. पण परत चौथा फटका लगावताना तो चुकला आणि रोसोऊने त्याचा अचूक झेल टिपला. रैनाने 32 चेंडूत 62 धावा ठोकल्या. रैनाच्या विकेटनंतर मात्र चेन्नईची धावांची गती एकदम मंदावली. रैना पाठोपाठ धोनी, जडेजा आणि ब्राव्होदेखिल ठरावीक अंतराने बाद झाले. त्यामुळे चेन्नईला 181 धावाच करता आल्या. बेंगळुरूकडून चहलने तीन अब्दुल्लाने दोन तर पटेलने एक बळी घेतला.