आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • T 20 World Cup 2014 : Australia Vs India Match Latest News In Marathi

T-20 WC:टीम इंडियाची विजयी गुढी,ऑस्ट्रेलियावर 73 धावांनी मात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मीरपूर - युवराजसिंगच्या (60) तडाखेबाज अर्धशतकानंतर आर. अश्विन (4/11) आणि अमित मिर्शा (2/13) यांच्या दमदार फिरकीच्या बळावर भारताने वर्ल्डकप टी-20 तील ग्रुप 2 मध्ये अखेरच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाला 73 धावांनी हरवले. वर्ल्डकपमध्ये भारताचा हा सलग चौथा विजय तर ऑस्ट्रेलियाचा सलग तिसरा पराभव ठरला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 159 धावा काढल्या. यानंतर भारतीय गोलंदाजांनी कांगांरूंना 16.2 षटकांत अवघ्या 86 धावांत गुंडाळून दणदणीत विजय मिळवला. आता धोनी ब्रिगेडला दुसर्‍या उपांत्य सामन्यात शुक्रवारी 4 एप्रिल रोजी अ गटात दुसरे स्थान मिळवणार्‍या संघासोबत खेळायचे आहे.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीस बोलावले. भारताच्या डावाचा शिल्पकार युवराजसिंग ठरला. युवीनेच सामना गाजवला. युवी वगळता रोहित शर्मा (5), सुरेश रैना (6), रवींद्र जडेजा (3) यांना या वेळी अपेक्षेनुसार कामगिरी करता आली नाही. रहाणेने 19, कोहलीने 23, तर कर्णधार धोनीने 24 धावांचे योगदान दिले.
धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी फक्त खेळपट्टीवर हजेरी लावण्याचे काम केले. त्यांचे फलंदाज नियमित अंतराने बाद होत गेले. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात तब्बल आठ फलंदाज खेळवले, तरही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक 23 धावा काढल्या. डेव्हिड वॉर्नरने 19 तर ब्रेड हॉजने 13 धावा काढल्या. इतर फलंदाजांना तर दोनअंकी धावसंख्यासुद्धा गाठता आली नाही. फिंच (6), व्हाइट (0), वॉटसन (1), बेली (8), हॅडिन (6) यांचे अपयश ऑस्ट्रेलियाला भोवले. भारताकडून अश्विनने 11 धावांत 4 गडी बाद केले.