आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE T 20 World Cup 2014 Pakistan Vs Australia Match Latest News In Marathi

T-20 WC : रोमांचक लढतीत पाकची कांगारूंवर 19 धावांनी मात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मीरपूर - वर्ल्डकप टी-20 च्या ब गटात झालेल्या अटीतटीच्या लढतीत पाकिस्तानने ऑस्ट्रेलियावर 19 धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानने दिलेल्या 191 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघ सर्वबाद 175 धावा करू शकला. झंझावाती खेळी करणारा पाकिस्तानचा उमर अकमल (94) सामनावीर ठरला.

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 5 बाद 191 धावा उभारल्या. सलामीवीर अहमद शहजाद 5, कामरान अकमल 31 आणि मोहंमद हाफिजने 13 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या उमर अकमलने तुफानी फटकेबाजी केली. त्याचे शतक अवघ्या 6 धावांनी हुकले. त्याने 54 चेंडंूत 9 चौकार आणि 4 षटकार खेचत 94 धावा ठोकल्या. त्याला मिशेल स्टार्कने ग्लेन मॅक्सवेलकरवी झेलबाद केले. शाहिद आफ्रिदी 20 धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाच्या नॅथन कुल्टर नाइलने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया निर्धारित षटकांत सर्वबाद 175 धावा करू शकला. यात एकाकी झुंज देणार्‍या सलामीवीर अ‍ॅरोन फिंच (65) आणि ग्लेन मॅक्सवेल (74) यांची अर्धशतके व्यर्थ ठरली. इतर फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. डेव्हिड वॉर्नर (4), शेन वॉटसन (4), कर्णधार जॉर्ज बेली (4), ब्रेड हॉज (2), ब्रेड हॅडिन (8) स्वस्तात बाद झाले. पाकिस्तानतर्फे झुल्फिखार बाबर, उमर गुल, शाहिद आफ्रिदी आणि बिलावल भट्टीने प्रत्येकी दोन फलंदाज तंबूत पाठवले.

संक्षिप्त धावफलक
(पाकिस्तान :5 बाद 191. कामरान अकमल 31, उमर अकमल 94 धावा. नॅथन कुल्टर नाइल 2/36. ऑस्ट्रेलिया : सर्वबाद 175. अ‍ॅरोन फिंच 65, ग्लेन मॅक्सवेल 74 धावा. झुल्फिखार बाबर 2/26, उमर गुल 2/29.)