आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE T 20 World Cup : India Vs Pakistan Supar 10 Match Latest News In Marathi

टी-20 विश्‍वचषक : टीम इंडियाची पाकवर 7 गड्यांनी मात; अमित मिश्रा सामनावीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मीरपूर - कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने शुक्रवारी आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 7 गड्यांनी मात केली. या विजयासह टीम इंडियाने आशिया चषकातील पराभवाचा पाकला हिशेब चुकता केला. या विजयाच्या बळावर भारताने दोन गुणांची कमाई केली. आता भारताचा दुसरा सामना रविवारी वेस्ट इंडीजशी होईल.


प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने सात गडी गमावून 130 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने 3 गड्यांच्या मोबदल्यात 18.3 षटकांत लक्ष्य गाठले. सुरेश रैना (नाबाद 35) आणि विराट कोहली (नाबाद 36) यांनी केलेल्या अभेद्य 66 धावांच्या भागीदारीच्या बळावर टीम इंडियाने सामना जिंकला. अमित मिश्रा सामनावीरचा मानकरी ठरला.


धावांचा पाठलाग करणा-या भारताला रोहित शर्मा (24) आणि शिखर धवन (30) यांनी 55 धावांच्या भागीदारीची सलामी दिली. धवनने 28 चेंडूंत पाच चौकारांसह 30 धावा काढल्या. युवराज (1) झटपट बाद झाला.
मिश्राने (2/22) धारदार गोलंदाजी करून प्रथम पाकला 130 धावांत रोखले. पाककडून उमर अकमलने सर्वाधिक 33 धावांची खेळी केली. रवींद्र जडेजा, भुवनेश्वर आणि शमीने प्रत्येकी एक गडी बाद केला.
नाणेफेक जिंकून टीम इंडियाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. धोनीचा हा निर्णय भुवनेश्वरने सार्थकी लावला. त्याने कामरान अकमलला (8) धावबाद करून भारताला पहिला बळी मिळवून दिला. 3 बाद 47 धावा, अशा संकटात पाक संघ सापडला होता. शहजाद (22) आणि मो.हफिज (15) झटपट बाद झाले. शोएब मलिक व उमर अकमलने चौथ्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली.


आफ्रिदी अपयशी
आशिया चषकात भारतविरुद्ध लढतीत शानदार फलंदाजी करणारा पाकचा शाहिद अफ्रिदी सपशेल अपयशी ठरला. त्याला अवघ्या आठ धावांचे योगदान देता आले.

धावफलक
पाकिस्तान धावा चेंडू 4 6
अकमल धावबाद (कुमार) 8 10 2 0
शहजाद यष्टी धोनी गो. मिश्रा 22 17 2 0
हाफिज झे.कुमार गो.जडेजा 15 22 1 0
उमर अकमल झे.रैना गो. शमी 33 30 2 0
मलिक झे. रैना गो.मिश्रा 18 20 1 1
आफ्रिदी झे. रैना गो. कुमार 8 10 1 0
मकसूद धावबाद (जडेजा) 21 11 2 1
भट्टी नाबाद 0 0 0 0
अवांतर : 05. एकूण : 20 षटकांत 7 बाद 130 धावा. गडी बाद होण्याचा क्रम : 1-9, 2-44, 3-47, 4-97, 5-103, 6-114, 7-130. गोलंदाजी : आर अश्विन 4-0-23-0, भुवनेश्वर कुमार 3-0-21-1, मो. शमी 4-0-31-1, अमित मिश्रा 4-1-22-2, रविंद्र जडेजा 4-0-18-1, युवराज सिंग 1-0-13-0.
भारत धावा चेंडू 4 6
रोहित शर्मा त्रि. गो. अजमल 24 21 1 2
शिखर धवन झे. अजमल गो. गुल 30 28 5 0
विराट कोहली नाबाद 36 32 4 1
युवराजसिंग त्रि. गो. बिलावल 01 02 0 0
सुरेश रैना नाबाद 35 28 4 1
अवांतर : 05. एकूण : 18.3 षटकांत 3 बाद 131 धावा. गडी बाद होण्याचा क्रम : 1-54, 2-64, 3-65. गोलंदाजी : मो. हाफिज 3-0-14-0, जुनैद खान 3-0-23-0, सईद अजमल 4-0-18-1, उमर गुल 3.3-0-35-1, शाहिद आफ्रिदी 3-0-24-0, बिलावल भाटी 2-0-17-1. सामनावीर : अमित मिश्रा.