आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE T 20 World Cup : Shrilanka Vs India Match News In Marathi

अत्यंत चुरशीच्या सामन्यात श्रीलंकेची भारतावर मात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिरपूर - टी - 20 विश्वचषकातील पहिल्याच सराव सामन्यात आशिया चषक विजेत्या श्रीलंकेने पुन्हा भारतावर मात केली. अखेरच्या षटकात 12 धावा करण्याचे आव्हान भारताच्या शेवटच्या फळीतील फलंदाजांना पेलवले नाही.
भारताचा संपूर्ण डाव सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर 148 धावांवर संपुष्टात आल्याने श्रीलंकेने पाच धावांनी भारतावर विजय मिळवला . त्याआधी प्रथम फलंदाजी करताना जयवर्धने आणि चांदीमल यांनी केलेल्या भागीदारीमुळे श्रीलंकेला दीडशेचा आकडा गाठणे शक्य झाले. जयवर्धनेने 30 तर चांदीमलने 29 धावांची उपयुक्त खेळी केली. परेराने सलामीला येऊन केलेल्या 21 धावा आणि कुलसेकराने अखेरच्या टप्प्यात येऊन केलेल्या 21 धावांमुळे श्रीलंकेला 20 षटकात 6 बाद 153 धावा करणे शक्य झाले. भारताकडून सुरेश रैनाने 41 तर युवराजसिंगने 33 धावांची तडाखेबंद खेळी केली. मात्र, भारतीय फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेल्याने भारताला सरावाच्या सामन्यातही पराभव पत्करावा लागला. दरम्यान भारताचा स्पर्धेतील पहिला सामना 21 मार्चला पाकिस्तानसमवेत रंगणार आहे.