आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Live Update Of India Vs Australia One Day Cricket Match

IND Vs AUS: पावसामुळे सामना रद्द, इंग्लंड विरुध्दच्या सामन्यावर ठरणार भवितव्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी : तिरंगी मालिकेत भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेला एकदिवसीय सामना पावसामुळे आज रद्द करण्यात आला. आता भारत आणि इंग्लंडमध्ये होणारा सामना भारताचे भवितव्य ठरवेल.

आज सकाळीच पावसामुळे सामना सुरू होण्यास उशीर झाला होता. तिसर्‍या षटकानंतर पावसाचे आगमन झाल्यामुळे हा सामना 44 षटकांचा करण्यात आला होता. त्यानंतर जेव्हा पुन्हा सामना सुरू झाला, तेव्हा भारताने 16 षटकांमध्ये दोन गडी गमावून 69 धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने सामना थांबवावा लागला.

या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला अंबाती रायडूरुपाने दुसरा धक्का बसला. रायडूने २४ चेंडूत २३ धावा काढल्या आहेत. काही वेळापूर्वीच भारताच्या सलामी जोडीतील शिखर धवन अवघ्या आठ धावांकाढून बाद झाला होता. स्टार्कच्या गोलंदाजीवर फींचने धवनचा झेल घेतला. तर मार्शच्या गोलंदाजीवर वार्नरने रायडूचा झेल घेतला आहे. सध्या मैदानावर राहाणे आणि विराट कोहली खेळत आहेत.
पावसामुळे उशीरा सुरू झालेल्या भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान होणार्‍या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदजीची संधी दिली. टीम इंडियासाठी हा सामना 'करा अथवा मरा' असा आहे. जर या सामन्यात टीम इंडियाचा विजय होतो, तर 2015 मधील हा भारताचा पहिला विजय असेल. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघाने सुरूवातीचे दोन सामने जिंकून या तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात आपले स्थान निश्चित केले आहे.
पुढील स्लाईडवर पाहा, या सामन्याची काही दृश्ये...