आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE Update Sri Lanka Tour Of India, 5th ODI: India V Sri Lanka At Ranchi

श्रीलंकेचा धुव्वा, भारत विजयी; कर्णधारांचा सेम टू सेम झंझावात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॅथ्यूज सामनावीर, तर कोहली मालिकावीराचा मानकरी
रांची- विराट कोहलीच्या (नाबाद १३९) विजयी षटकाराच्या बळावर भारताने रविवारी मालिकेतील शेवटच्या आणि पाचव्या वनडेत श्रीलंकेला धूळ चारली. रांचीच्या मैदानावर यजमान भारताने तीन गड्यांनी सामना जिंकला. याशिवाय भारताने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ५-० ने लंकेचा धुव्वा उडवला. भारताचा हा पाचवा विजय ठरला.
प्रथम फलंदाजी करताना श्रीलंका संघाने आठ बाद २८६ धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने ४८.४ षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. कोहलीच्या विराट खेळीतून भारताने शानदार विजय साकारला.
धावांचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियाचे सलामीवीर अजिंक्य रहाणे (२) रोहित शर्मा (९) झटपट बाद झाले. गत चौथ्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध विक्रमी २६४ धावांची खेळी करणारा रोहित रांचीच्या मैदानावर सपशेल अपयशी ठरला. त्याला मॅथ्यूजने त्रिफळाचीत केले. रोहितने १२ चेंडूंचा सामना करताना दोन चौकारांच्या आधारे नऊ धावांची खेळी केली.
कोहलीची शतकी भागीदारी
अंबातीरायडू आणि विराट कोहलीने तिसऱ्या गड्यासाठी १३६ धावांची भागीदारी करताना संघाच्या धावसंख्येचा आलेख उंचावला. दरम्यान, चोरटी धाव घेताना अंबाती रायडू धावचीत झाला. त्याने ६९ चेंडूंत ५९ धावा काढल्या. त्यानंतर रॉबिन उथप्पा १९, केदार जाधव २० बिन्नी १२ धावा काढून बाद झाले. आर. अश्विनला भोपळाही फोडता आला नाही.
तत्पूर्वी, श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, धवल कुलकर्णीने ४.४ षटकांत सलामीवीर डिकवेल्ला (४) अंबाती रायडूकरवी झेलबाद केले. त्यापाठोपाठ बिन्नीने दिलशानला (२४) तंबूत पाठवले. मॅथ्यूज आणि लाहिरू थिरिमानेने लंकेचा डाव सावरला. या दोघांनी पाचव्या गड्यासाठी १२८ धावांची भागीदारी केली.
भारताचे फाइव्ह स्टार विजय
१६९धावांनी पहिला सामना नोव्हेंबर २०१४
गड्यांनी दुसरा सामना नोव्हेंबर २०१४
गड्यांनी तिसरा सामना नोव्हेंबर २०१४
१५३ धावांनी चौथा सामना १३ नोव्हेंबर २०१४
गड्यांनी पाचवा साम1ना १६ नोव्हेंबर २०१४
अक्षरचे ११ बळी
गुजरातच्या २० वर्षीय अक्षर पटेलने श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिकेत निवड समितीने दिलेल्या संधीचे सोने केले. त्याने पाच सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करताना एकूण ११ बळी घेतले. त्याने तिसऱ्या सामन्यात ४० धावा देत तीन गडी बाद केले. त्यानंतर इतर चारही सामन्यांत प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. त्यापाठोपाठ अश्विनने चार सामन्यांत एकूण सहा गडी बाद केले.
श्रीलंकेविरुद्ध पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकल्यानंतर ट्रॉफीसह जल्लोष करताना भारतीय संघाचे खेळाडू.
श्रीलंकेविरुद्ध भारताचा १०० वा विजय
भारतीयसंघाने रविवारी श्रीलंका संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय सामन्यात १०० व्या विजयाची नोंद केली. यात ८३ वनडे, १४ कसोटी आणि तीन टी-२० सामन्यांचा समावेश आहे. यासह भारताच्या संघाने आपल्या विजयाचे शानदार शतक झळकावले. भारताने वनडेत श्रीलंकेला तीन गड्यांनी हरवून मालिका ५-० ने जिंकली.
धवलची धारदार गोलंदाजी
भारताकडूनधवल कुलकर्णी, अक्षर पटेल आणि आर. अश्विनने धारदार गोलंदाजी केली. यात धवलने ५७ धावा देताना तीन गडी बाद केले. त्यापाठोपाठ अश्विन आणि अक्षर पटेलने प्रत्येकी दोन बळी घेतले. स्टुअर्ट बिन्नीने एक विकेट घेतली. श्रीलंकेकडून अजंता मेंडिसने बळींचा चौकार मारला. त्याने भारताच्या चार विकेट घेतल्या.
भारताच्या आर. अश्विनचे एकूण २५१ बळी पूर्ण
धावफलक
श्रीलंका धावा चेंडू
डिकवेलझे. रायडू गो. कुलकर्णी ०४ १०
दिलशान त्रि. गो. बिन्नी ३५ २४
चांदिमल झे. रोहित गो. पटेल ०५ ३१
जयवर्धने झे. रहाणे गो. आश्विन ३२ ३३
अँजेलो मॅथ्यूज नाबाद १३९ ११६ १०
थिरिमाने झे. रायडू गो. आश्विन ५२ ७६
टी. परेरा गो. जाधव गो. पटेल ०६ ०५
प्रसन्ना झे. पटेल गो. कुलकर्णी ०० ०४
मेंडिस झे. कर्ण गो. कुलकर्णी ०० ०१
अवांतर: १३.एकूण:५० षटकांत बाद २८६ धावा. गडीबाद होण्याचा क्रम :१-३२, २-४५, ३-७३, ४-८५, ५-२१३, ६-२५८, ७-२८७, ८-२८६. गोलंदाजी:धवल कुलकर्णी ८-०-५७-३, बिन्नी ८-१-२८-१, अक्षर पटेल १०-०-४५-२, आर. अश्विन १०-१-५६-२, कर्ण शर्मा १०-०-६१-०, अंबाती रायडू ४-०-३३-०.
भारत धावा चेंडू
रहाणेत्रि. गो. मॅथ्यूज ०२ १०
रोहित त्रि. गो. मॅथ्यूज ०९ १२ अंबाती रायडू धावबाद ५९ ६९
विराट कोहली नाबाद १३९ १२६ १२ उथप्पा झे. मॅथ्यूज गो. मेंडिस १९ २१
केदार जाधव त्रि.गो. मेंडिस २० २४
बिन्नी यष्टी. चंदीमल गो. मेंडिस १२ १५
आश्विन पायचीत गो. मेंडिस ०० ०१
अक्षर पटेल नाबाद १७ १४
अवांतर: ११.एकूण:४८.४ षटकांत बाद २८८ धावा. गडीबाद होण्याचा क्रम :१-६, २-१४, ३-१५०, ४-१८०, ५-२१५, ६-२३१, ७-२३१. गोलंदाजी:कुलशेखरा ९-०-८९-१, मॅथ्यूज ७-१-३३-२, गामागे ४-०-२५-०, इरंगा ७-०-४५-०, टी. परेरा ३-०-२०-०, प्रसन्ना १०-०-४२-०, मेंडिस ९.४-०-७३-४, टी. दिलशान ८-०-४६-०.
भारत श्रीलंका या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी सेम टू सेम झंझावाती खेळी केली. यात भारताच्या कोहलीने १२६ चेंडूंचा सामना करताना नाबाद १३९ धावा काढल्या. यात १२ चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे. तत्पूर्वी, श्रीलंकेचा कर्णधार मॅथ्यूजने ११६ चेंडूंत सहा चौकार आणि दहा षटकारांच्या आधारे नाबाद १३९ धावांची खेळी केली.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, भारतविरुद्ध श्रीलंका लढतीचे फोटो...