आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • LIVE Women Forced To Play Bra Less At Wimbledon 2014 News In Marathi, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विम्बल्डनमध्ये नाइलाजास्तव ब्रा विना खेळतात महिला; माजी खेळाडूचा गौप्‍यस्‍फोट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडनमध्‍ये- विम्‍बल्‍डनमध्‍ये महिला टेनिसपटूंना नाईलाजाने ब्रा शिवाय खेळावे लागत असल्‍याचा खळबळजनक खुलासा माजी चॅम्पियन पॅट कॅशने केला आहे. पॅटने बीबीसी रेडिओ 5 लाइव्‍हला दिलेल्‍या मुलाखतीदरम्‍यान असा खुलासा केला.
काही महिला खेळाडूंना सामना सुरु होण्‍यापूर्वी ब्रा आणि टॉप बदलण्‍याचे निर्देश देण्‍यात आले होते. कारण त्‍याचे अंडरगारमेंट्स रंगीत होते. काही टेनिसपटूंना सामन्‍यांच्‍या पंचांनी ऑफिसमध्‍ये बोलावून अंत:वस्‍त्र बदलण्‍याचे सांगितले होते. कारण तिने निळ्या रंगाची अंडरविअर परिधान केली होती. घामामुळे त्‍याचा रंग बाहेर दिसत होता. काही महिला टेनिसपटूंकडे योग्‍य अंडरगारमेंट्स नसल्‍याने त्‍यांना ब्रा विना खेळण्‍याची पाळी आल्‍याचे पॅटने म्‍हटले आहे.
पॅटद्वारा केलेल्‍या खळबळजनक खुलास्‍यावर विम्‍बल्‍डनच्‍या प्रवक्‍त्यांनी प्रतिक्रिया देण्‍यास नकार दर्शविला. परंतु त्‍यांनी नवीन नियमांविषयी विस्‍ताराने सांगितले.
काय आहेत नियम?
यावर्षीपासून आयोजकांनी नवीन नियम पारित केला असून खेळाडूंनी पांढरेच कपडे परिधान करण्‍याच्‍या सूचना दिल्‍या आहेत. खेळाडू आपल्‍या गणवेशावर अन्‍य रंगाची पट्टी लावू शकतो परंतु त्‍याची रुंदी 1 सेंटीमीटरपेक्षा कमी असायला हवी.
पांढ-या कपड्यांचा नियम गेल्‍या वर्षीपासूनच सुरु असून आम्‍ही आतापर्यंत कोण्‍या खेळाडूला रंगीत ब्रा परिधान केल्‍यावरुन बाहेर काढले नाही. तसेच बदललेल्‍या नियमांची खेळाडूंना माहिती दिली आहे. अशी माहिती विम्‍बल्‍डनचे प्रवक्‍ता जॉन फ्रेंड यांनी दिली.
उल्‍लेखनिय म्‍हणजे चॅम्पियन सेरेना विल्‍यम्‍ससह अनेक महिला खेळाडूंनी रंगीत गारमेंट्स परिधान करुन ड्रेसकोडचे पालन केले नाही. 2013 मध्‍ये मारिया शारापोव्‍हाने नारंगी रंगाचे शॉट्स परिधान केले होते. तर सेरेनाने गर्द गुलाबी रंगाचे अंत:वस्‍त्र परिधान केले होते.
व्‍हीनसने केले स्‍वागत
या नियमावर विविध खेळाडूंनी प्रतिक्रीया दिली, कुणी नाराजी वर्तवली परंतु व्‍हीनसने या‍ निर्णयाचे स्‍वागत केले आहे. ती म्‍हणाली, 'हा चांगला बदल असून पांढ-या पोषाखामध्‍ये सर्वचजन चांगले दिसतात. दोन आठवडे पांढरा पोषाख परिधान करने काही वाईट गोष्‍ट नाही'.
फेडररच्‍या बुटावर आरोप
2013 च्‍या विम्‍‍बल्‍डनमध्‍ये रॉजर फेडररला बूट बदलण्‍याचे निर्देश देण्‍यात आले होते. फेडररने नारंगी रंगाच्‍या सोलचे बुट वापरले होते.

पुढील स्‍लाइडवर वाचा, कधी कधी झाले विवाद