आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • London And Wells Cricket Board Fixing News In Marathi

फिक्सिंग : विन्सेंट, आरिफवर आरोप निश्चित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) कौंटी क्रिकेट संघाचा माजी खेळाडू असलेला न्यूझीलंडचा लोऊ विन्सेंट आणि पाकच्या नावेद आरिफवर मॅच फिक्सिंगप्रकरणी आरोप निश्चित केले आहे. विन्सेंटवर ससेक्स आणि लंकेशायरदरम्यान खेळला गेलेला टी-20 सामना तसेच ससेक्स आणि केंट यांच्यादरम्यान खेळल्या गेलेला 40 षटकांचा सामना फिक्स केल्याचे एकूण 14 आरोप निश्चित करण्यात आले. आरिफवर ससेक्स व केंट यांच्यातील 40 षटकांचा सामना फिक्स केल्याप्रकरणी 6 प्रकारचे आरोप निश्चित झाले.

यामुळे विन्सेंटवर शंका
लंकेशायरविरुद्ध सामन्यात विन्सेंटने 7 चेंडूत एकच धाव काढली होती. टी-20 च्या या उपउपांत्य लढतीत लंकेशायरने 20 धावांनी विजय मिळवला होता. धावांचा पाठलाग करताना विन्सेंटने दिलेला सोपा झेल संशयाच्या भोवर्‍यात सापडला आहे.