आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लंडन डायरी : हिमाचलच्या मुलीसोबतच लग्न : विजयकुमार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी हिमाचलच्याच मुलीशी लग्न करणार आहे. लग्नासाठी मुली शोधण्याची जबाबदारी माझ्या वडिलांकडे सोपवली असून ते योग्य हिमाचलच्या मुलीचा शोध घेत आहेत, असे ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत रौप्यपदक पटकावणा-या विजयकुमारने सांगितले. माझे एकत्रित कुटुंब आहे. त्यात माझे आई-वडील, काका-काकू आणि भाऊ-वहिनी राहतात. माझ्या विजयाचा जल्लोष मी घरीच जाऊन साजरा करणार आहे. आता मला घरी जाऊन आईने बनवलेला गोड भात खाण्याचे वेध लागले आहेत. माझी कौटुंबिक स्थिती अत्यंत हलाखीची होती. लष्करातील नोकरीमुळेच मी ही कामगिरी करू शकलो, अशा भावना त्याने व्यक्त केल्या.
मेयर जॉन्सनचा खेळाडंना सॅल्यूट - शनिवारी तब्बल सहा सुवर्णपदके जिंकून देशाचा झेंडा उंचावण्याची चमकदार कामगिरी करणा-या इंग्लंडच्या खेळाडूंना स्थानिक महापौर बोरिस जॉन्सन यांनी सॅल्यूट केला. ‘शनिवारचा दिवस ख-या अर्थाने माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला. सुवर्णपदक जिंकणा-या खेळाडूंनी देशवासीयांची मने जिंकली. रोइंगमध्ये अवघ्या 20 मिनिटांत देशाने सुवर्णपदक जिंकण्याची केलेली किमयाही उल्लेखनीय आहे,’ अशा शब्दांत त्यांनी खेळाडूंचे कौतुक केले.
इंग्लंडचे फुटबॉल चाहते निराश - दक्षिण कोरियाच्या धडाकेबाज कामगिरीपुढे रविवारी यजमान इंग्लंड पुरुष फुटबॉल संघाचे ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आणले. कोरियाने 5-4 अशा फरकाने रोमहर्षक विजय मिळवला. स्टार खेळाडूंच्या सुमार कामगिरीमुळे आणि इंग्लंडच्या या पराभवामुळे स्थानिक फुटबॉल चाहते चांगले निराश झाले आहेत. या विजयासह कोरियाने उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. मंगळवारपासून पुरुष गटातील फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीला सुरुवात होणार आहे.