आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लंडन डायरी : लंडन रेल्वेचा विक्रम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन शहराची रक्तवाहिनी म्हणून ओळखली जाणारी अंडर ग्राऊंड, ओव्हर ग्राऊंड आणि डीएलआर या ट्रेन्सनी प्रवाशांची वाहतूक करण्याचा उच्चांक ऑलिम्पिकच्या पहिल्या आठवड्यात केला आहे. पहिल्या आठवड्यात 43 लाख लोकांनी या रेल्वेचा वापर केला. रस्त्यावरील ट्रॅफिक जॅमला कंटाळून अनेकांनी रेल्वेने प्रवास करणे पसंत केले. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष जॅक रॉग यांचाही समावेश होता.
मोठ्या स्टेजचे खेळाडू - मोठ्या कलाकारांना मोठे स्टेज लागते. युसेन बोल्ट अ‍ॅथलेटिक्स ट्रॅकवर गेल्या दोन महिन्यांतील अपयश धुऊन टाकत असतानाच मायकल फेल्प्सने अमेरिकेला हातून निसटत असलेले 4 बाय 100 मीटर्स मिडले रिलेचे सुवर्णपदक हस्तगत करून दिले. ब्रेस्टस्ट्रोकचा दुसरा टप्पा पोहणारा अमेरिकेचा मॅट ग्रेव्हर्स एवढा संथ होता, की फेल्प्सने बटरफ्लायसाठी पाण्यात उडी मारली तेव्हा जपान आघाडीवर होते. फेल्प्सने पिछाडी भरून काढलीच आणि अमेरिकेला निर्णायक आघाडीही मिळवून दिली. त्यामुळेच अमेरिकेला सुवर्णपदक मिळू शकले.