आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लंडन डायरी : खेळाडूंबाबत अभिमान बाळगा - अभिषेक बच्चन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये 80 वर्षे वेळांची अचूक नोंद ठेवणा-या ‘ओमेगा’ने लंडनमध्ये आयोजित केलेल्या बॉलीवूड बॅशमध्ये अभिषेक बच्चनने अनिवासी भारतीयांच्या प्रातिनिधिक आणि खोचक प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली.
120 कोटींच्या देशाला अवघी 3-4 पदके मिळतात, हे पाहून राग येत नाही का? या प्रश्नावर अभिषेक म्हणाला, ‘राग कशाला येणार? ज्या खेळाडूंनी देशाचे नाव उज्ज्वल केले त्यांचा अभिमान वाटायला हवा. पदके मिळावीत म्हणून प्रयत्न करायला हवेत. जे प्रयत्न होत आहेत त्याबाबत राग करण्याचे कारणच नाही. आज कोणत्याही खेळातील खेळाडूच देशवासीयांना एकत्र बांधून ठेवतात, देशभक्ती वाढवतात, त्यातून देशाची एकात्मता दिसून येते. त्यामुळे जी पदके येताहेत त्याबद्दल अभिमानच वाटायला हवा.’ अभिषेकने फुटबॉल, बास्केटबॉल किंवा भारताला पदके देणा-या खेळाला, संघाला दत्तक घेण्यात आपल्याला रस असल्याचे या वेळी सांगितले.
थ्री पोझिशन रायफल शूटिंगमध्ये भारताच्या गगन नारंगला पाठदुखीमुळे आज पदक गमवावे लागले. काल सायंकाळपासूनच त्याची पाठ दुखत होती. त्यावर केलेले उपाय लागू पडले नाहीत. त्याने प्रोन प्रकारात सुवर्णपदक विजेत्यानंतर दुसरा क्रमांक (398 गुण) मिळवला होता. नीलिंजमध्ये त्याने 389 गुण मिळवून पदक मिळवण्याच्या दृष्टीने उत्तम सरासरी राखली होती. मात्र, स्टँडिंग पोझिशनमध्ये दुख-या पाठीने त्याला आज दगा दिला. त्याने तरीही चिकाटी दाखवून सर्व राऊंड पूर्ण केले; परंतु काही वेळा दुखणा-या पाठीचा त्रास जाणवल्यामुळे त्याला पूर्ण 10 गुण कायम घेता आले नाहीत.
बोल्टचे सेलिब्रेशन! - 200 मीटर्स आणि रिले शर्यती बाकी आहेत, म्हणून इतक्यात 100 मीटर्स विजयाचे सेलिब्रेशन नाही, असे म्हणणा-या युसेन बोल्टने विजयाच्या रात्रीच तीन स्वीडिश महिला हँडबॉल खेळाडूंसोबत सँडविच खाऊन विजयाचा आनंद साजरा केला. स्वीडनच्या त्या महिला खेळाडूंनी आपला अनुभव सांगताना म्हटले की, आम्ही जमैका संघाच्या व्यवस्थापकांकडे बोल्टला भेटण्याची परवानगी मागितली होती. बोल्ट दारू पीत नाही. आम्ही जवळजवळ 90 मिनिटे त्याच्या रूममध्ये होतो. ‘ओ टू’ अ‍ॅरेना या ईस्ट लंडनमधील
सुखवस्तू विभागात वसलेले जमैका हाउसही सोमवारी गजबजले होते. इंग्लंडच्या जोखडातून मुक्त झालेल्या जमैकाच्या स्वातंत्र्याला 50 वर्षे झाली. सोमवारी त्या समारंभाचे आणि बोल्टच्या 100 मीटर्स शर्यतीच्या विजयाचे औचित्य साधून जमैका हाउसमध्ये जंगी पार्टी आयोजित करण्यात आली होती. युसेन बोल्ट त्या पार्टीचा हीरो होता. जमैकाच्या पंतप्रधानांपेक्षाही तो लोकप्रिय झाला आहे.