आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुरुषांसोबत सराव करतेय महिला कुस्तीपटू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एल्मोदिन जॉर्ज- ऐकण्यास हे जरी थोडे विचित्र वाटत असले तरी सत्य असे आहे की, किर्गिस्तान येथील 19 वर्षीय महिला कुस्तीपटू एइसुलू टिनीबेकोवा लंडन आॅलिम्पिकची तयारी पुरुष मल्लांसोबत करत आहे. तेही आपल्या वजनापेक्षा 10 किलो अधिक वजन गटातील पुरुषांसोबत. तिच्याशिवाय दुसरी कोणतीही महिला कुस्तीपटू यामध्ये सहभागी नाही. एवढे असूनही तिला पदकाची मोठी आशा आहे.
बास्केटबॉल खेळून झाली मोठी
19 वर्षीय टिनीबेकोवाची कथा ही इतरांपेक्षा वेगळी आहे. ती अर्थशास्त्राची विद्यार्थिनी आहे. डोंगराळ परिसरातील आपल्या गावात ती मुलांसोबत बॉस्केटबॉल खेळत होती. दरम्यान, तिने कराटे शिकण्याचा प्रयत्न केला. यासाठी तिच्या आईने मनाई केली. या परिसरातील गावांमध्ये मुलींना खेळण्यासाठी पाठवले जात नाही. पूर्व सोव्हिएत संघाची राजधानी बिशकेक येथे टिनीबेकोवा शिक्षण घेत होती. त्या वेळी प्रशिक्षकाने तिला शोधून काढले.
‘पहिल्यांदा पाहिल्यावर टिनीबेकोवामध्ये उल्लेखनीय कामगिरी करण्याचे कौशल्य असल्याचे दिसले. यातुन लंडन गेम्ससाठी तिला मार्गदर्शन केले जात आहे. ताकद वाढवण्यासाठी ती घोडीचे दूध पिते. तसेच आठवडाभरात दोन वेळा बिशकेक येथील टेकड्यांमध्ये 10 किलोमीटर धावते,’ अशी माहिती प्रशिक्षक नुरबेक इजाबेकोव यांनी दिली.

टीव्हीवर झळकण्याची तीव्र इच्छा

लहानपणापासून टीव्हीवर झळकावे अशी तिची इच्छा आहे. लंडन आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर हे स्वप्न पूर्ण होईल. लंडनमध्ये पर्यटक म्हणून नव्हे तर खेळाडूच्या भूमिकेत मी जाणार आहे, असेही टिनीबेकोवाने सांगितले. समुद्रसपाटीपासून 1500 मीटरवर असलेल्या एल्मोदिन येथील डोंगराळ भागात धावतांना महिला कुस्तीपटू टिनीबेकाव. लंडन गेम्समध्ये ती महिला फ्री स्टाइलमध्ये सहभागी होणार आहे.