आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघी दुमदुमली क्रिकेटची पंढरी;विश्व एकादशवर एमसीसी इलेव्हनचा विजय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉर्डस् - अँरोन फिंचच्या दमदार 181 आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या 44 धावांच्या बळावर एमसीसी इलेव्हनने शेष विश्व एकादश संघाचा सात गडी राखून पराभव केला. क्रिकेटची पंढरी समजल्या जाणार्‍या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर ही मैत्रीपूर्ण लढत खेळवण्यात आली.

या सामन्यात शेष विश्व एकादश संघाचे नेतृत्व महान फिरकीपटू शेन वॉर्नने तर एमसीसी संघाचे नेतृत्व मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केले. शेष विश्व एकादश संघाने नाणेफेक जिंकून या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. युवराज सिंगच्या शानदार 132 धावांच्या खेळीच्या भरवशावर शेष विश्व एकादशने एमसीसी इलेव्हनसमोर निर्धारित 50 षटकांत 7 बाद 294 धावांचे लक्ष्य ठेवले. यात सलामीवीर अँडम गिलख्रिस्ट (29), वीरेंद्र सेहवाग (22) यांनीही चांगली खेळी केली. सेहवागने आक्रमक सुरूवात केली. मात्र, तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला.

सामन्यात चार विकेट घेणार्‍या पाकिस्तानच्या सईद अजमलने तमीम इकबाल (1) आणि केव्हिन पीटरसन (10) यांना स्वस्तात बाद केले. त्यानंतर युवराजने चौफेर फलंदाजी करत 134 धावांची धुवाधार खेळी केली. शेष विश्व एकादश संघाच्या 294 धावांचा पाठलाग करण्यास उतरलेल्या एमसीसी इलेव्हनचे सलामीवीर सचिन तेंडुलकर आणि अँरोन फिंच यांनी शतकी भागीदारी केली. सचिन 44 धावांवर बाद झाला. मात्र, फिंचने 181 धावांची धुवाधार खेळी करत एसीसीला विजय मिळवून दिला. भारताचा ‘द वॉल’ राहुल द्रविड या सामन्यात शून्य धावांवरच बाद झाला.

(फोटो - लॉर्ड्सच्या द्विशताब्दीनिमित्त शनिवारी एमसीसी इलेव्हन विरुद्ध विश्व एकादश यांच्यात एकदिवसीय सामना खेळवण्यात आला. धाव घेताना एकदा युवराजसिंहने खट्याळपणे सचिनचा पाय ओढण्याचा प्रयत्न केला.)