आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जोहान्सबर्ग- क्रिकेट दक्षिण आफ्रिका (सीएसए)च्या सीईओ पदाचे प्रमूख दावेदार हारून लोर्गट यांच्या नियुक्तीमुळे सीएसए आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांचे संबंध बिघडू शकतात. आयसीसीच्या या माजी अधिका-याच्या नियुक्तीस बीसीसीआय विरोध करीत आहे.
सीएसएने सीईओ पदासाठी ज्या तीन उमेदवारांची निवड केली आहे. त्यामध्ये लोगर्ट यांच्या नावाचाही समावेश आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्यांच्या प्रशासकीय कामाचा अनुभव पाहता त्यांना या पदाचा प्रबळ दावेदार समजले जात आहे. मात्र, बीसीसीआयचा विरोध त्यांच्या विरूद्ध जाऊ शकतो.
सूत्रांकडून मिळालेल्या अहवालानुसार, लोगर्ट यांची सीईओ बनण्यासारखी परिस्थिती असल्यामुळे बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेच्या आगामी दौ-यातून माघार घेण्याची धमकी दिली आहे. सीएसएचे स्वतंत्र निदेशक नोर्म एरेंडसे यांनी यास पुष्टी दिली आहे. लोगर्ट जेव्हा आयसीसीचे सीईओ होते, तेव्हा त्यांचे बीसीसीआयशी संबंध चांगले नव्हते. बीसीसीआयचा कोणताही अधिकारी यावर खुलेपणाने बोलण्यास तयार नाही. परंतु, बीसीसीआयच्या एका पदाधिका-याने म्हटले आहे, की बीसीसीआयला लोगर्ट या पदावर येऊ नये असे वाटते.
बीसीसीआय यापूर्वीच आगामी मालिकेचा कार्यक्रम आपल्याला न विचारता ठरवल्यामुळे सीएसएवर नाराज आहे. सीएसएने या दौ-यात सात एकदिवसीय सामन्यांची घोषणा केली आहे. त्याचा बीसीसीआय विरोध करीत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.