आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्यापेक्षा एक वर्ष लहान पैलवानासोबत लग्न केलेय या ऑलिंपियनने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
5 महिन्यापूर्वी साक्षीने कॉमनवेल्थ गेम्स-2014 मधील मेडल विनर आपला सहकारी पैलवान सत्यव्रत कादियानसोबत लग्न केले होते. - Divya Marathi
5 महिन्यापूर्वी साक्षीने कॉमनवेल्थ गेम्स-2014 मधील मेडल विनर आपला सहकारी पैलवान सत्यव्रत कादियानसोबत लग्न केले होते.
स्पोर्ट्स डेस्क- ऑलिंपिक मेडल विनर रेसलर साक्षी मलिक आज 25 वर्षाची झाली. 5 महिन्यापूर्वी साक्षीने कॉमनवेल्थ गेम्स-2014 मधील मेडल विनर आपला सहकारी पैलवान सत्यव्रत कादियानसोबत लग्न केले होते. आता हे पैलवान जोडपे पुढील वर्षी होणा-या कॉमनवेल्थ गेम्ससोबतच 2020 च्या ऑलिंपिकची तयारी करत आहे. आज या निमित्त आम्ही सांगणार आहोत आपल्यापेक्षा 1 वर्षाच्या लहान पैलवानासोबत साक्षीचे कसे झाले प्रेम व पुढे का केले लग्न. एकत्रच तालीम करायेच साक्षी आणि सत्यव्रत...
 
- 25 वर्षाची साक्षी मलिकने 24 वर्षाच्या सत्यव्रतसोबत यावर्षी लग्न केले आहे. 
- सत्यव्रत कादियान रोहतकमध्ये तालीम चालवणारे पैलवान सत्यवान यांचा मुलगा आहे. तो 97 किलो वजनी गटात खेळतो. 
- पैलवान सत्यवान हेच सत्यव्रत आणि साक्षी यांचे गुरु आहेत. सत्यवान यांना अर्जुन अवॉर्ड मिळाला आहे. 
- सत्यव्रतने कॉमनवेल्थ गेम्समध्ये देशाला सिल्वर मेडल जिंकून दिले होते. 
- याशिवाय सत्यव्रतने भारत केसरी आणि चंबळ केसरी यासारखे किताब आपल्या नावावर केले आहेत. 
- तर, साक्षीने 2016 साली झालेल्या रिओ ऑलिंपिकमध्ये महिला कुस्तीत भारताला ब्राँझ मेडल जिंकून दिले होते. अशी कामगिरी करणारी साक्षी पहिली खेळाडू ठरली होती. 
- साक्षी आणि पैलवान सत्यव्रत एकाच तालमीत सराव करतात व हे दोघेही सत्यवान यांचे शिष्य आहेत.
 
इच्छाशक्ती व हार न मानण्याच्या वृत्तीने जिंकवले-
 
- साक्षीने संपूर्ण ऑलिंपिकमध्ये अफाट जिद्दीची प्रचिती दिली होती. खरं तर ती पराभूत झाली होती. मात्र तिची विरोधी खेळाडू फायनलमध्ये पोहोचल्यानंतर साक्षीला रिपचेजमध्ये कांस्यची संधी मिळाली. 
- कांस्यच्या लढतीतही तिने जिद्दीच्या बळावर सामना खेचून आणला होता. 
- कितीही संकट आले तरीही अखेरपर्यंत झुंज देत हार न मानण्याचा मजबूत इरादा साक्षीकडे आहे. रिओच्या त्या लढतीत पहिल्या हाफमध्ये साक्षी 5-0 अशी मागे पडली होती.
- मात्र, तिने सामन्याच्या अखेरच्या मिनिटात सामना फिरवून 8-5 ने बाजी मारली. अखेरच्या ८ सेकंदांत तिने चार गुण मिळवत विजय खेचून आणला होता.
- काहीही झाले तरीही जिंकायचे आहे, हे लक्ष साक्षीने ठरवले होते. तिच्या कामगिरीने लक्ष्यापुढे गगन ठेंगणे असल्याचे सिद्ध केले. साक्षीने जे लक्ष्य ठरवले, ते गाठले.
- साक्षीने प्रखर इच्छाशक्तीचे बळ दाखवले होते. इच्छाशक्ती असल्यास अशक्य वाटणारेही शक्य होते. पहिल्या हाफनंतरचा 5-0 असा स्कोअर बघून कांस्यचा सामना साक्षी जिंकू शकणार नाही, असे भारतीयांनी ग्रहित धरले होते. 
- तमाम भारतीयांनी हार मानली होती. मात्र, साक्षीने हार मानली नव्हती. अखेरच्या सेकंदापर्यंत आपण जिंकू शकतो हा विश्वासच तिला मेडल देऊन गेला.
 
पुढे स्लाई़डद्वारे पाहा, साक्षी मलिक व तिच्याशी संबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...