आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Lt. Col Mahendra Singh Dhoni Says Cricket No Limit

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘क्रिकेटची सीमा अमर्याद’, ले. कर्नल महेंद्रसिंह धोनीचे प्रतिपादन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूंछ - दोन देशांमध्ये रेषा आखली जाऊ शकते, मात्र क्रिकेटची सीमा ही अमर्याद आहे.त्यासाठी कोणत्याही प्रकारची सीमा नाही, असे मत लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंह धोनीने मांडले. येथील नियंत्रण रेषेला (एलओसी) त्याने शनिवारी भेट दिली.भारत व पाकिस्तान यांच्यातील संबंध नव्याने बहरले पाहिजेत. यासाठी दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डाची भूमिका परिणामकारक ठरणार आहे, असेही तो या वेळी म्हणाला. लेफ्टनंट कर्नल धोनीने भारतीय सैन्यदलासोबत जम्मू-काश्मीरची पाहणी केली. दरम्यान, त्याने पूंछ येथील नियंत्रण रेषेला भेट दिली. त्यानंतर धोनीने ले.जनरल ए.एस.नंदाल यांच्यासह पथकाची भेट घेतली. नगरोटा येथील वाईट नाइट क्रास मुख्यालयाची पाहणी केली. चीता येथील मुख्यालयाची पाहणी करण्यासाठी धोनीने हेलिकॅप्टरने प्रवास केला.
आज 15 व्या कोअर मुख्यालयाला भेट
महेंद्रसिंह धोनी रविवारी उधमपूर येथील उत्तर विभागाच्या मुख्यालयात जाणार आहे. त्यानंतर तो श्रीनगर येथील 15 व्या कोअर मुख्यालयाचा दौरा करणार आहे.दुपारी लेह येथील 14 व्या कोअर मुख्यालयाला भेट देण्याचा कार्यक्रम आहे. सियाचीन येथील आधार शिबिरालाही
तो भेट देणार आहे.
फायनलसाठी खास हजेरी
पहिल्या सत्राच्या काश्मीर प्रीमियर लीग स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी खेळवला जाणार आहे. त्यासाठी धोनी खास उपस्थित राहणार आहे.
निवृत्तीनंतर सैन्य दलाला वेळ देणार
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर पूर्ण वेळ सैन्य दलासाठी देणार आहे. देशाच्या सेवेमध्ये माझाही सहभाग महत्वाचा ठरेल, यासाठी प्रयत्न करणार आहे. अहोरात्र पहारा देऊन येथील सैनिक देशांचे संरक्षण करतात. या सेवेत खारीचा वाटा
उचलणार असल्याचेही धोनी म्हणाला.