आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Luise Hamiltan Win Japan Grandprix, Divya Marathi

लुइस हॅमिल्टन जपान ग्रँडप्रिक्स स्पर्धेचा विजेता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुजुका - मर्सिडीझचा ड्रायव्हर लुइस हॅमिल्टनने शानदार प्रदर्शन करताना जपान ग्रँडप्रिक्स फॉर्म्युला वन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्याच्याच संघाच्या निको रोसबर्गला वरचढ ठरत त्याने बाजी मारली. रोसबर्गने दुसरे स्थान पटकावले. मूळ इंग्लंडचा रहिवासी असलेल्या हॅमिल्टनने सुरुवातीपासून स्पर्धेवर पकड ठेवली. फ्रेंचमन ड्रायव्हर ज्युलिस बिनाचीची गाडी अपघातग्रस्त झाल्याने त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात बिनाची गंभीररीत्या जखमी झाला.

स्पर्धेच्या २९ फे-यांपर्यंत रोसबर्ग आणि हॅमिल्टन यांच्यात चांगली झुंज रंगली होती. यानंतर हॅमिल्टनने आघाडी घेतली. हॅमिल्टनने १ तास ५१ मिनिटे, ४३.०२१ सेकंदाच्या वेळेसह अव्वल स्थान मिळवले. त्याचा संघ सहकारी निको रोसबर्ग ९.१ सेकंदाने मागे राहिला. रेडबुल संघाच्या सेबेस्टियन वेटेलने तिसरे स्थान पटकावले. रेडबुलचा डॅनियल रिकार्डो चौथ्या स्थानावर राहिला.

प्रतिकूल परिस्थिती
येथे गाडी चालवण्यास प्रतिकूल परिस्थिती होती. पावसामुळे समोरचे स्पष्ट दिसतही नव्हते. पहिले सत्र सर्वांसाठीच सारखे होते. दुसरे सत्र अधिक कठीण ठरले. मी माझ्या कामगिरीवर समाधानी आहे. हुल्केनबर्ग, फोर्स इंडिया.