आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'त्याने\' मारली 25 हजार फूटांवरून पॅराशूटशिवाय उडी, 193km वेगाने खाली आला!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेतील ल्यूक एकिन्सने 25 हजार फूट उंचीवरून पॅराशूटशिवाय उडी मारण्याचा पराक्रम केला आहे. - Divya Marathi
अमेरिकेतील ल्यूक एकिन्सने 25 हजार फूट उंचीवरून पॅराशूटशिवाय उडी मारण्याचा पराक्रम केला आहे.
लॉस एंजलिस- अमेरिकेतील ल्यूक एकिन्सने 25 हजार फूट उंचीवरून पॅराशूटशिवाय उडी मारण्याचा पराक्रम केला आहे. असे करणारा तो जगातील पहिला व्यक्ती ठरला आहे. ही उडी त्याने अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील सिमी डोंगराळ भागातून सुमारे 7.6 किलोमीटर ऊंचीवरून मारली. यानंतर तो सरळ 100 फूट लांब आणि 100 फूट रूंद अशा जाळीवर पडला. ल्यूक बाह्या सरसावत दोन मिनिटाच्या आताच जमिनीपासून 200 फूट ऊंचावर बांधलेल्या जाळेत येऊन पडला. उडी मारल्यानंतर त्याचा वेग 193 किमी प्रती तास इतका होता. सुरक्षा टाळून ल्यूकचे धाडस...
- ल्यूकने उडी मारताना 10,000 फूटावर पोहचताच ऑक्सीजन मास्क हटविले.
- त्याचा हा पराक्रम फॉक्स टीव्हीच्या ‘हेवन सेंट’प्रोग्राममध्ये लाईव्ह दाखवण्यात आला.
- रिकॉर्डिंगसाठी ल्यूकसोबत त्याचे अन्य तीन स्कायडाइवरनी सुद्धा उडी मारली होती. त्यांनी 5000 फूटानंतर पॅराशूट खोलली होती.
- ही उडी मारतानाचे खास वैशिष्ट्ये म्हणजे ल्यूकने यासाठी कोणतेही सुरक्षा न घेता धाडस केले.
आजोबा-वडील आणि पत्नी सुद्धा स्कायडायवर-
- ल्यूकच्या चार वर्षाच्या मुलाने आणि स्काय डायवर असलेल्या पत्नी मोनिकाने सुद्धा ही रिकॉर्ड ब्रेकिंग जम्प पाहिली.
- सुरक्षित पद्धतीने खाली आल्यानंतर सर्वप्रथम त्याने पत्नी मोनिका आणि चार वर्षाचा मुलगा लोगनची गळाभेट घेतली.
- एकिन्स एक प्रोफेशनल स्काय डायवर आहे, आतापर्यंत त्याने 18 हजार वेळा स्काय डाइविंग केले आहे.
- ल्यूक 12 वर्षाचा असल्यापासून स्कायडाइविंग करीत आहे. त्याचे वडिल आणि आजोबा सुद्धा स्काय डायवर होते.
- अमेरिकी पॅराशूट असोसिएशनचा सल्लागार ल्यूकने फिल्म आयर्नमॅन-3 मध्ये स्टंट केले आहेत.
वेगाचे गणित असे समजून घ्या-
- 343 मीटर/सेकंद आहे सुपरसोनिक विमानाचा वेग.
- ल्यूक 63 मी./सेकंद वेगाने खाली आला. म्हणजेच सुपरसोनिक विमानाच्या पाच पट कमी गतीने.
- ल्यूकने सुरुवातीला 10 हजार फूटांपर्यंत ऑक्सीजनची मदत घेतली.
आईने नाही पाहिली उडी-
- ल्यूकचा हा पराक्रम पाहण्यासाठी हजारों लोग गोळा झाले होते मात्र आई उपस्थित नव्हती.
- तिला ल्यूकने यशस्वी उडी मारल्याचे नंतर सांगण्यात आले. उडी मारताना त्याची आई त्याच्यासाठी प्रार्थना करीत होती.
- ल्यूकच्या माहितीनुसार, त्याला त्याच्या आईने सांगितले होते की, अशा प्रकारे उडी मारताना मी त्याला पाहू शकत नाही.
उडी मारल्याचे नंतर कळले महत्त्व-
- रिकॉर्ड बनल्यानंतर एकिन्सने सांगितले की, प्रथम मी नर्व्हस होतो, मात्र परफेक्ट तयारी असेल तर कोणी काहीही करू शकतो.
- ल्यूक म्हणाला, मी उडत होतो, तो एक जबरदस्त अनुभव होता. तो अनुभव शेअर करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज आणि व्हिडिओमधून ल्यूकची रिकॉर्ड ब्रेक उडी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...