आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Luxury Life Of Cricketer Mansoor Ali Khan Pataudi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अशी आलिशान जीवनशैली होती पतोडींची, दुर्मिळ छायाचित्रातून पाहा त्‍यांचा थाट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेट इतिहासात अनेक दर्जेदार खेळाडू होऊन गेले आहेत. काहींनी आपल्‍या बॅटने तर काहींनी चेंडूने तर काहींनी नेतृत्‍व करण्‍यात आपण सर्वोत्‍कृष्‍ट असल्‍याचे दाखवून दिले. मात्र, क्‍वचितच असे खेळाडू झाले आहेत, ज्‍यांच्‍यावर आघात होऊनही त्‍यांनी कधी हार मानली नाही.

यापैकीच एक दबंग खेळाडू होते ते म्‍हणजे मन्‍सूर अली खान पतोडी. भारतातील निवडक मुस्लिम कर्णधारांमध्‍ये समाविष्‍ट असलेल्‍या पतोडींनी आपल्‍या करिअरमध्‍ये जी काही कामगिरी केली आहे. त्‍याची बरोबरी सर डॉन ब्रॅडमन, सचिन तेंडुलकर किंवा महेंद्रसिंह धोनीही करू शकत नाहीत.

एकूण 46 सामने खेळून 6 शतकांसहित 2793 धावा बनवणे सोपे वाटते. परंतु, फक्‍त एका डोळयाने दिसत असताना, विदेशी गोलंदाजांना त्रस्‍त करणे वाटते तितके सोपे नाही.

एका घटनेवरून पतोडी किती महान होती याची खात्री पटते. क्रिकेटमधील कारकीर्द सुरू होण्‍यापूर्वीच पतोडींनी आपला एक डोळा गमावला होता, हे सर्वांना ज्ञात आहेच. मात्र, या जगाचा निरोप घेण्‍यापूर्वी त्‍यांनी आपला उर्वरित एक डोळाही दान केला होता.

पतोडी यांच्‍या करिअर आणि त्‍यांच्‍या शानदार व्‍यक्तिमत्‍वाला सलाम करीत आम्‍ही तुम्‍हाला दाखवत आहोत, त्‍यांच्‍या आयुष्‍यातील काही माहित नसलेले क्षण. या फोटोंमध्‍ये लपले आहे, पतोडी यांची मस्‍ती, अ‍ॅट्टियूड, स्‍टाईल, कुटुंबाप्रतीचे प्रेम आणि मित्रांचा याराना. आज पतोडी आपल्‍यामध्‍ये नाहीत. मात्र, हे फोटो कायम आपल्‍यामध्‍ये जिवंत राहतील. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा टायगर पतोडी यांची शान, आलिशान जीवनशैली... तसेच कसे थाटात राहायचे ज्‍युनिअर पतोडी...