आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Lydia Ko Golf's World Number One At The Age Of 17

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

17 वर्षीय लीडियाने मोडला टाइगर वुड्सचा विश्‍व विक्रम, ठरली नंबर वन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्लोरिडा- 17 वर्षीय लीडियाने अमेरिकेच्‍या टायगर वुड्सचा विश्‍वविक्रम मोडित काढून नंबर वन पदी विराजमान झाली आहे.
वुड्सने 1997 मध्‍ये वयाच्‍या 21 व्‍या वर्षी प्रथम क्रमांक पटकाविला होता. परंतु, कोरियाच्‍या लीडियाने फ्लोरिडामध्‍ये सुरु असलेल्‍या एलपीजीए गोल्फ चॅम्पियनशिपमध्‍ये दुसरे स्‍थान मिळवत टॉप रँकिंग मिळविले आहे.
काय म्‍हणाली लीडिया
‘हा विक्रम रचण्‍यासाठी काय करावे लागेल याची मला कल्‍पना नव्‍हती. मी फक्‍त माझ्या खेळावर लक्ष केंद्रित केले. सर्वांत कमी वयात नंबर वन गोल्‍फर ठरल्‍यामुळे मी अगदी आनंदी आहे’, असे लीडियाने सामना संपल्‍यानंतर सांगितले.
वुड्स अंडर-50 मधून पडू शकतो बाहेर
वूड्सने फोनिक्स ओपनमध्‍ये 82 वे कार्ड खेळले त्‍यामध्‍ये त्‍याचे अत्‍यंत वाइट प्रदर्शन राहिले आहे. त्‍या प्रदर्शनामुळे वूड्सची रँकिग 50 च्‍या ही खाली जावू शकते. आठ महिन्‍यापूर्वी ते पहिल्‍या क्रमांकावर होते.
पुढील स्‍लाइडवर पाहा, लीडियाची निवडक छायाचित्रे...