आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्णधार सॅमीच्या सुमार कामगिरीवर लॉइडची नाराजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार क्लाइव्ह लॉइड यांनी सध्याचा कर्णधार डॅरेन सॅमीच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून सॅमीच्या पदाबाबत पुनर्विचार होण्याची गरज व्यक्त केलीय. कोलकाता कसोटीत पाच बाद 120 अशी अवस्था असणार्‍या भारतीय संघावर दबाव टाकण्यात वेस्ट इंडीज अपयशी ठरला, असे ते म्हणाले.
वेस्ट इंडीजला सलग दोन वेळा विश्वचषक जिंकून देणारा, सलग 27 कसोटी सामन्यांमध्ये पराभूत न होणारा अशी ख्याती असलेल्या लॉइडचा समावेश जगातील सवरेत्तम क्रिकेट कर्णधारांमध्ये होतो. लॉइड हे मात्र सॅमीच्या कामगिरीवर नाराज आहे. पुण्यातील ‘ब्लेड्स ऑफ ग्लोरी’ या क्रिकेट वस्तुसंग्रहालयाला भेट देण्यासाठी ते आले. संग्रहालयाचे संस्थापक रोहन पाटे या वेळी उपस्थित होते. ‘भारताविरुद्ध कसोटी मालिकेत विंडीजची कामगिरी अत्यंत खराब झाली. सॅमीने कामगिरी उंचावण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. संघातील युवा खेळाडूंना योग्य वेळी संधी मिळणे गरजेचे आहे,’’ असे लॉइड म्हणाला.
कर्णधार सॅमीच्या सुमार कामगिरीवर लॉइडची नाराजी
वेस्ट इंडीज क्रिकेटची दुरवस्था
कधी काळी जगावर राज्य गाजवणार्‍या वेस्ट इंडीज क्रिकेटमध्ये दर्जेदार युवा खेळाडूंचा दुष्काळ पडला आहे. पूर्वीसारख्या महान खेळाडूंची पुढची पिढी आमच्याकडे निर्माण झाली नाही, अशी खंत लॉइड यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, आताच्या आमच्या युवकांसमोर अँथलेटिक्स, बास्केटबॉल, फुटबॉल, बॉक्सिंग असे अधिक आकर्षक पर्याय आहेत. त्यामुळे उपलब्ध गुणवत्तेची जोपासना करणे वेस्ट इंडीज क्रिकेटसाठी महत्त्वाचे झाले आहे.
सचिनचे रेकॉर्ड्स मोडणे अशक्य
सचिन महान खेळाडू असून माणूस म्हणूनही चांगला आहे. त्याला मैदानावर खेळताना पाहून मला चांगले वाटायचे. त्याची अखंड 24 वर्षांची कारकीर्द महत्त्वाची आहे. त्याच्यासारखे कोणी खेळेल असे सध्या मला वाटत नाही. त्यामुळे त्याचे रेकॉर्ड्स मोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. दीडशे कसोटी खेळलेला वेस्ट इंडीजचा शिवनारायण चंद्रपॉल सचिनच्या जवळपास जाऊ शकतो. - क्लाइव्ह लॉइड