आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माद्रिद अाेपन टेनिस स्पर्धा : शारापाेवा, सेरेनाचे पॅकअप !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माद्रिद - जगातील माजी नंबर वन राफेल नदालने माद्रिद अाेपन टेनिस स्पर्धेत अागेकूच केली. नदालने पुरुष एकेरीतील विजयी माेहीम अबाधित ठेवून अंतिम अाठमध्ये धडक मारली. दुसरीकडे रशियाच्या मारिया शारापाेवा अाणि सेरेनाला महिला एकेरीच्या उपांत्य फेरीतील पराभवाने पॅकअप करावे लागले.

दुखापतीमधून नुकत्याच सावरलेल्या नदालने शानदार खेळी करताना पुरुष एकेरीच्या सामन्यात इटलीच्या सिमाेन बाेलेलीचा पराभव केला. त्याने ६-२, ६-२ ने एकतर्फी विजयाची नाेंद केली. यासह त्याने अंतिम अाठमधील अापला प्रवेश निश्चित केला. नाेवाक याेकाेविकच्या अनुपस्थितीमध्ये अाता नदालला पुरुष एकेरीच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात अाहे.

वावरिंका, त्साेंगाचा पराभव
दिमित्राेवने सामन्यात स्विसच्या स्टॅन वावरिंकाविरुद्ध सनसनाटी विजयाची नाेंद केली. त्याने सरळ तीन सेटपर्यंत रंगलेला सामना ७-५, ३-६, ६-३ अशा फरकाने जिंकला. दुसरीकडे टाॅमस बर्डिचने फ्रान्सच्या ज्याे विल्फ्रेंड त्साेंगाला बाहेरचा रस्ता दाखवला. त्याने ७-५, ६-२ अशा फरकाने सामना जिंकला.

पेत्राकडून सेेरेना पराभूत
महिला एकेरीच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात पेत्रा क्विताेव्हाने सनसनाटी विजयाची नाेंद केली. तिने जगातील नंबर वन सेरेना विल्यम्सचा सरळ दाेन सेटमध्ये पराभव केला. पेत्राने ६-२, ६-३ अशा फरकाने सेमीफायनलमध्ये एकतर्फी विजय मिळवला. यासह तिने महिला एकेरीची अंतिम फेरी गाठली.

कुज्नेत्साेवाची शारापाेवावर मात
महिला एकेरीत रशियाच्या शारापाेवाने वाेज्नियाकीवर मात करून उपांत्य फेरी गाठली हाेती. मात्र, तिला फार काळ अाव्हान कायम ठेवता अाले नाही. तिला रशियाच्या स्वेतलाना कुज्नेत्साेवाने धुळ चारली. कुज्नेत्साेवाने ६-२, ६-४ अशा फरकाने शानदार विजयाची नाेंद केली. यासह तिने महिला एकेरीची अंतिम फेरी गाठली.
बातम्या आणखी आहेत...