माद्रिद, बार्सिलोना विजयी / माद्रिद, बार्सिलोना विजयी

वृत्तसंस्‍था

Jan 08,2013 02:41:00 AM IST

माद्रिद - स्पॅनिश फुटबॉल लीगमध्ये क्रिस्टियानो रोनाल्डोच्या रियल माद्रिद व लियोनेल मेसीच्या एफसी बार्सिलोनाने शानदार विजय मिळवला. लीगच्या पहिल्या सामन्यात माद्रिदने रियल सोशिदादला 4-3 अशा फरकाने धूळ चारली. दुसरीकडे बार्सिलोनाने आरसीडी इस्पानयोलला 4-0 ने पराभूत केले. या विजयासह संघांनी स्पर्धेत आगेकूच केली. सोशिदाद लढतीत रोनाल्डो व प्रिटो यांनी शानदार कामगिरी केली. प्रिटोने (9, 40, 76 मि.) तीन गोल केले. माद्रिदकडून रोनाल्डोने (68, 70 मि.) दोन गोल केले. बेन्झेमाने दुस-या मिनिटाला गोल करून माद्रिदला आघाडी मिळवून दिली.

X
COMMENT