आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाद्रिद - इंग्लंडचा अँडी मुरे आणि भारताचे महेश भूपती- रोहन बोपन्नाने शुक्रवारी माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. सहाव्या मानांकित जोडीने अर्जेंटिनाच्या जुआन मोनाको आणि होराशियो जेबालोसवर 6-3, 3-6, 10-5 ने विजय मिळवला. दुसरीकडे लियांडर पेस-ऑस्ट्रियाचा जर्गन मेल्जरला दुहेरीच्या सामन्यात जर्मनीच्या टॉमी हास-राडेक स्टीपानेकने 7-5, 6-1 ने हरवले.
नदाल अंतिम आठमध्ये
जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या राफेल नदालने मिखाइल याउजेनीचा 6-2, 6-3 अशा फरकाने पराभव केला. आता त्याचा सामना डेव्हिड फेररसोबत होईल.
ग्रिगोरचा पराभव
नोवाक योकोविकला पराभूत करणा-या ग्रिगोर दिमित्रोवला विजयी लय अबाधित ठेवता आली नाही. त्याला तिस-या फेरीत धूळ चाखावी लागली. स्टेनलिस वांवरिकाने ग्रिगोरवर 3-6, 6-4, 6-1 अशा फरकाने हरवले.
सेरेना सेमीफायनलमध्ये
जगातील नंबर वन सेरेना विल्यम्सने शुक्रवारी माद्रिद ओपनच्या सेमीफायनमध्ये प्रवेश केला. तिने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत अॅनाबेल मेडिना गॅरिगुएसला 6-3, 0-6, 7-5 ने पराभूत केले.
मुरेची सिमोनवर मात
लंडन ऑलिम्पिक चॅम्पियन अँडी मुरेने जॉइल्स सिमोनचा 2-6, 6-4, 7-6 अशा फरकाने पराभव केला. त्याच्यासमोर आता सहाव्या मानांकित थॉमस बर्डिचचे तगडे आव्हान असेल.
फेडररचा अनपेक्षित पराभव
गतविजेता रॉजर फेडररला माद्रिद तिस-या फेरीत अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. जपानच्या केई निशिकोरीने या लढतीत सनसनाटी विजय मिळवला. त्याने फेडररला 6-4, 1-6, 6-3 ने धूळ चारली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.