आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Madrida Open Tenis : Serena, Fedarra Enter In Third Round

माद्रिद ओपन टेनिस स्पर्धा : सेरेना, फेडरर तिस-या फेरीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माद्रिद - जागतिक क्रमवारीतील नंबर वन महिला खेळाडू अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने स्पेनच्या लोरडेज डॉमिन गुएज लिनोला 6-2, 7-5 ने पराभूत करून माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेच्या तिस-या फेरीत प्रवेश केला आहे. स्विस किंग फेडररने तिसरी फेरी गाठली. मात्र, जागतिक क्रमवारीतील नंबर वन टेनिसपटू सर्बियाच्या नोवाक योकोविकचा बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोवकडून धक्कादायक पराभव झाला.


पहिल्या सेटमध्ये लिनोने सेरेनाची सर्व्हिस मोडून शानदार सुरुवात केली. मात्र, नंतर सेरेनाने पुनरागमन करून तिला जोरदार प्रत्युत्तर दिले. दुस-या सेटमध्ये सेरेनाने 2-0 ने आघाडी घेतली. मात्र, लिनोने पुन्हा 2-2 अशी बरोबरी केली. सेरेनाने सात गेम जिंकून दुसरा सेटही आपल्या नावे केला.


फेडररची आगेकूच
तत्पूर्वी, गतविजेता आणि स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने चेक गणराज्यच्या रादेक स्तेपानेकला सरळ सेटमध्ये 6-3, 6-3 ने हरवत तिस-या फेरीत प्रवेश केला. दोन महिन्यांनंतर आपला पहिला सामना खेळणा-या फेडररने स्तेपानेकाची सर्व्हिस मोडून सामन्यात आपला दबदबा निर्माण केला. यानंतर त्याने दुस-या सेटमध्ये तीन वेळा चेकच्या खेळाडूची सर्व्हिस मोडली. त्याने एक तास आणि 21 मिनिटांत ही लढत जिंकली. इतर एका लढतीत अँडी मुरेने जर्मनीच्या लोरियन मेयरला एका संघर्षमय लढतीत हरवले.


योकोविकचा पराभव
दुस-या फेरीत दिमित्रोवने योकोविकवर 6-7, 7-6, 3-6 ने विजय मिळवला. इतर एका लढतीत रॉजर फेडररने आगेकूच केली. 28 वा मानांकित दिमित्रोवने पहिल्या सेटमध्ये तीन गुण मिळवत आघाडी घेतली. त्याने टायब्रेकमध्ये 7-6 ने बाजी मारली. दुस-या सेटमध्ये योकोविक बेसलाइनजवळ घसरला आणि त्याची टाच दुखावली. उपचारामुळे थोडा वेळ सामना थांबला होता. मोठ्या ब्रेकमुळे चाहते चांगलेच निराश झाले आणि त्यांनी योकोविकऐवजी दिमित्रोवचे समर्थन केले. मला चाहत्यांकडून आशा समर्थनाची आशा नव्हती, असे सामन्यानंतर दिमित्रोवने म्हटले.