आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Madrida Open Tenis : Sharapova Reached Semifinal Round; Azarenka Out

माद्रिद ओपन टेनिस : शारापोवा उपांत्यपूर्व फेरीत; अझारेंका आऊट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माद्रिद - रशियाची मारिया शारापोवा आणि अव्वल मानांकित सेरेना विल्यम्सने माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दुस-या मानांकित शारापोवाने जर्मनीच्या सेबाइन लिसिकाला 6-2, 7-5 ने हरवले. सेरेनाने रशियाच्या मारिया किरिलेंकोवर 6-3, 6-1 ने मात केली.


अझारेंकाचा पराभव
जागतिक क्रमवारीत तिस-या स्थानी असलेल्या व्हिक्टोरिया अझारेंकाला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला. बेलारूसच्या या खेळाडूला महिला एकेरीच्या दुस-या फेरीत रशियाच्या एकातेरिना मकारोवाने पराभूत केले. तिने या सामन्यात 1-6, 6-2, 6-3 अशा फरकाने सनसनाटी विजय मिळवला. अझारेंकाने पहिला सेट सहज जिंकला. मात्र, मकारोवाने दुस-या सेटमध्ये पुनरागमन करून दुसरा सेट आपल्या नावे केला. तिस-या निर्णायक सेटमध्ये अझारेंकाने निराशाजनक कामगिरी केली. याचा फायदा घेत मकारोवाने तिस-या सेटमध्ये बाजी मारली.


नदालची आगेकूच
स्पेनच्या राफेल नदालने पुरुष एकेरीच्या दुस-या फेरीत फ्रान्सच्या बेनोएट पेयरवर मात केली. त्याने 6-3, 6-4 असा सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवला. तिस-या फेरीत त्याचा सामना रशियाच्या मिखाईल युजनीसोबत होईल.
सानिया-बेथानी बाहेर भारताची सानिया मिर्झा व अमेरिकेची बेथानी माटेक-सँडला माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेत पराभवाला सामोरे जावे लागले. बिगरमानांकित अनास्तासिया पावलुचेंकोवा व लुसी सफरोवाने 7-5, 6-1 ने विजय मिळवला.