आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअर्जेंटीनाचा कर्णधार आणि बार्सिलोना क्लबचा स्टार स्ट्रायकर लियोनेल मेसीसाठी हा आठवडा कमालीचा राहिला. तो खेळत असलेला क्लब बार्सिलोनाने सलग दोन पराभवानंतर मंगळवारी एसी मिलानसारख्या ताकदवान संघावर 4-0ने मात करून चॅम्पियन्स लीगच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला.
बार्सिलोनाच्या या विजयात मेसीची कामगिरी महत्वपूर्ण अशी होती. सामन्यात दोन गोल करणा-या मेसीने जबरदस्त सुरूवात करताना अवघ्या पाच मिनिटांत संघाला आघाडी मिळवून दिली.
या विजयाबरोबरच मेसी आणि त्याच्या संघाने किताबावर आपला दावा मजबूत केला आहे. मैदानावर आपल्या ड्रिबलींग, वेग आणि आपल्या शक्तीशाली किकने प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंच्या मनात धडकी भरवणा-या मेसीने गोल केल्यानंतर एकदा आपल्या टी शर्टमध्ये फुटबॉल घालून आपल्या चाहत्यांना एक वेगळा संदेश दिला होता.
फुटबॉल विश्वचषकातील या सुपर हिरोच्या स्पोर्ट्स आणि वैयक्तीक आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी आणि त्याचा तो खास संदेश काय होता हे जाणून घेण्यासाठी पुढच्या स्लाईडला क्लिक करा...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.