» Magra Admired Sachin And Captan Dhoni

मॅकग्राने केली सचिन व कर्णधार धोनीची स्तुती

वृत्तसंस्था | Feb 20, 2013, 02:06 AM IST

  • मॅकग्राने केली  सचिन व  कर्णधार धोनीची स्तुती

सिडनी - सर्व देशांच्या टीमला भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटीपटू ग्लेन मॅकग्रा यांनी धोनीची स्तुती केली. भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेपूर्वी त्यांनी भारताच्या खेळाडूंचे तोंडभरून कौतुक केले आहे.

मॅकग्राने भारतीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत धोनीवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. ‘भारत व इंग्लंड कसोटी मालिका मी पाहिली नाही. मात्र, धोनीवर सर्वाधिक कसोटी खेळणा-या देशांचा विश्वास आहे. मी त्याच्या नेतृत्वक्षमतेचा चाहता आहे. धोनी दबावात होता. मात्र, इंग्लंडचा पराभव निश्चित करण्यासाठी धोनीने आपल्या टीमच्या डावपेचात आवश्यक ती सुधारणा केली,’ असेही ते म्हणाले.

‘सचिनला या गोष्टीचा पूर्ण अधिकार आहे की त्याने निवृत्ती कधी घ्यावी आणि कधी घेऊ नये. कसोटीबाबत सचिनचा उत्साह कायम आहे. नुकत्याच मुंबईत झालेल्या रणजी करंडकात केलेल्या कामगिरीमुळे सचिन संघात आपले स्थान निश्चित करण्यास इच्छुक आहे, असे म्हटले जाते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयाची मदार सचिनवर असेल, असेही त्यांनी सांगितले. ऑस्ट्रेलियासाठी हे वर्ष अधिकच व्यग्र आहे. ही टीम वर्षाच्या शेवटी बॅक टू बॅक अ‍ॅशेस मालिका खेळणार आहे.

Next Article

Recommended