आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Assam Face; Mumbai, Gujarat Challenge In Front

महाराष्‍ट्र -आसाम सामना; मुंबईसमोर गुजरातचे आव्हान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुवाहाटी -जबरदस्त फॉर्मात असलेला महाराष्‍ट्रचा संघ रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत विजयी ‘चौकार’ मारण्यासाठी सज्ज झाला आहे. या टीमचा सामना यजमान आसामशी होईल. क गटात हा सामना रंगणार आहे. सात सामन्यांत तीन सामने जिंकून महाराष्‍ट्राने क गटात 29 गुणांसह अव्वल स्थान गाठले. दुसरीकडे या गटात आसाम टीम 14 गुणांसह आठव्या स्थानी आहे.
मुंबई-गुजरात सामना :

स्पर्धेच्या अ गटात मुंबई आणि यजमान गुजरात समोरासमोर असतील. वलसाड येथे हा सामना रंगणार आहे. यजमान गुजरात टीम 26 गुणांसह गुणतालिकेत दुसर्‍या आणि मुंबई 23 गुणांसह तिसर्‍या स्थानी आहे. मुंबईने आतापर्यंत सात सामन्यांत एकूण तीन सामने जिंकले. मुंबईसाठी हा सामना ‘करा वा मरा’ असा आहे. त्यामुळे विजयी पताका फडकावण्याचा मुंबईचा प्रयत्न असेल.


मनीष रावला पुन्हा संधी :

गुजरातविरुद्ध रणजी सामन्यात मनीष रावला पुन्हा मुंबई संघात स्थान देण्यात आले. गुजरातविरुद्ध महत्त्वपूर्ण सामन्यासाठी मनीषला विश्रांती देऊन इक्बाल अब्दुल्लाला संधी देण्यात आली. संघातील युवा फलंदाज सिद्धेश लाडला दुखापत झाली. त्यामुळे विश्रांती देण्यात आलेल्या मनीषला रिकॉल देण्यात आला.


असे रंगतील सामने
महाराष्‍ट्र विरुद्ध आसाम गुवाहाटी
दिल्ली विरुद्ध कर्नाटक दिल्ली
गुजरात विरुद्ध मुंबई वलसाड
हैदराबाद विरुद्ध केरळ हैदराबाद
राजस्थान विरुद्ध बडोदा जयपूर
तामिळनाडू विरुद्ध बंगाल चेन्नई