आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Cricket Association Cricket Match News

सचिनचे शतक; डेक्कनविरुद्ध औरंगाबादच्या 367 धावा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धेत सचिन लव्हेराच्या (146) शतकाच्या बळावर औरंगाबादने डेक्कन विरुद्ध सर्वबाद 367 धावा उभारल्या. दिवसअखेर डेक्कनने 3 बाद 38 धावा काढल्या.
प्रथम फलंदाजी करणार्‍या औरंगाबादने सर्वबाद 377 धावा केल्या. सलामीवीर प्रज्वल घोडके (11) आणि शुभम जाधव (6) धावा काढून बाद झाले. त्यानंतर आलेल्या आकाश मगरेने 38 धावा केल्या. मधल्या फळीतील सचिन लव्हेराने शतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. त्याने 122 चेंडंूचा सामना करताना 20 चौकार आणि 3 षटकार खेचत 146 धावा ठोकल्या. नरूल सय्यदने 33, हरमिंदरसिंग पल्लायाने 50 आणि अंकित अंबेपवारने महत्त्वाच्या 46 धावा करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. प्रत्युत्तरात डेक्कनचा डाव डळमळला. त्यांचे दिवसअखेर 38 धावांत 3 फलंदाज तंबूत परतले. औरंगाबादच्या शुभम मोहितेने 10 धावा देत 2 आणि अंकित अंबेपवारने एक बळी घेतला.