आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायकलिंगमध्ये महाराष्ट्राचे दुहेरी यश, रुतूजा आणि अभिनंदन यांनी पटकावले सुवर्ण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोची - केरळात सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रविवारचा दिवस महाराष्ट्राच्या सायकलपटूंनी गाजवला. महिलांच्या एलिट गटात महाराष्ट्राच्या रुतूजा सातपुतेने दमदार कामगिरी करताना सुवर्णपदक पटकावले, तर एलिट पुरुष गटातील स्पर्धेत राज्याच्या अभिनंदन भोसले याने कांस्यपदकाची कमाई केली.

रुतूजाने ४६.४९.१४५ मिनिटांच्या वेळेस अव्वलस्थान मिळवले. यजमान केरळची सायकलपटू क्रिश्नेनडू टी. क्रिश्नाने रौप्यपदक तर केरळच्याच महिता मोहनने कांस्यपदक जिंकले. महाराष्ट्राची खेळाडू प्रीती शिंदेचे कांस्यपदक थोडक्याने हुकले. ती चौथ्या क्रमांकावर आली. महाराष्ट्राची दीपाली शिलधानकरला आठव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
पुरुष एलिट सायकल स्पर्धेत हरियाणाच्या पंकजकुमारने ३.२२.०४.४७१ मिनिटांच्या वेळेसह सुवर्णपदक जिंकले. कर्नाटकच्या एन. लोकेशने रौप्यपदक तर महाराष्ट्राच्या अभिनंदन भोसलेने कांस्यपदकावर ताबा मिळवला. लोकेशने ३.२२.०४.५१२ मिनिटे तर अभिनंदनने ३.२२.०४.७९७ मिनिटांसह तिसरे स्थान मिळवले. सायकल स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अनपेक्षीतपणे चांगली कामगिरी करताना पदकांची कमाई केली.