आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिली महाराष्ट्र खो-खो प्रीमियर लीग आजपासून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पहिल्या महाराष्ट्र खो-खो प्रीमियर लीगला गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. आयपीएलच्या धर्तीवर होत असलेल्या या स्पर्धेत सहा फ्रँचायझींचे संघ सहभागी झाले आहेत. राज्यातील 78 अव्वल खेळाडूंना या केपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे.

शिवाजी पार्कच्या मैदानावर खो-खोच्या प्रीमियर लीगचा पहिला प्रयोग होणार आहे. या ठिकाणी साधारणत: पाच हजार प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ही स्पर्धा महाराष्‍ट्र राज्य खो-खो संघटनेच्या मान्यतेने आणि त्यांच्याच तांत्रिक मदतीने आयोजित करण्यात येत आहे.

सहाही संघांना फ्रँचायझीज मिळाल्यामुळे खेळाडूंना ब-यापैकी आर्थिक लाभ होणार हे निश्चित झालेय. आमदार भाई जगताप यांनी मुंबई रायडर्सची फ्रँचायझी घेतली असून पिंपरी-चिंचवडचे नगरसेवक महेश लांडगे अहमदनगर हीरोजची सर्व जबाबदारी सांभाळतील. तसेच आमदार आशिष शेलार (सबर्बन योद्धाज), एफ. पी. ए. इंटरप्राइजेस (सांगली स्मॅशर्स), वैशाली लोंढे (ठाणे थंडर्स) आणि बाबूराव चांदेरे (पुणे फायटर्स) यांनीसुद्धा एकेका संघांची फ्रँचायझी घेतली आहे. फ्रँचायझीप्रमाणे प्रत्येक संघाला तेवढेच दिग्गज प्रशिक्षकही लाभले आहेत. बिपिन पाटील (सबर्बन योद्धाज), पांडुरंग परब (मुंबई रायडर्स), नितीन जाधव (ठाणे थंडरर्स) मार्गदर्शन करतील.

टीमचे कर्णधार
मुंबई रायडर्स : मनोज वैद्य, सबर्बन योद्धाज : राहुल तामगावे, पुणे फायटर्स : कुणाल वाईकर, ठाणे थंडर्स : विलास करंडे , सांगली स्मॅशर्स : युवराज जाधव, अहमदनगर हीरोज : अमोल जाधव (अहमदनगर हीरोज)