आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra State Sport Policy News In Marathi, Financial Suport

क्रीडा सुविधा निर्मितीसाठी 15 लाखांपर्यंत अर्थसाहाय्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - राज्याच्या क्रीडा धोरणातील एक महत्त्वाची व प्रमुख शिफारस क्रीडा सुविधा निर्मितीसाठी अर्थसाह्य करणे अशी आहे. राज्यातील खेळाडूंना अद्ययावत क्रीडा सुविधा निर्माण होण्यासाठी राज्य शासनाच्या क्रीडा खात्याने अर्थसाह्य देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील विविध नोंदणीकृत शिक्षण संस्था, क्रीडा संस्थांसह नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीस याचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी संबंधित संस्थेस 25 टक्के स्वत:चा हिस्सा खर्च करावा लागेल व त्यांची स्वत:ची जागा असणे गरजेचे आहे. यासाठी संबंधित संस्थेस क्रीडा सुविधेसह क्रीडांगण विकसित करता येईल, बंदिस्त प्रेक्षागृह बांधता येईल. हे अर्थसाह्य खेळाच्या प्रकारानुसार मंजूर करण्यात आले आहे. यासाठी 25 हजारांपासून ते 15 लाखांपर्यंत अर्थसाह्य मंजूर करण्यात येईल. त्यासाठी संबंधित जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत असे प्रस्ताव सादर करावे लागतील.


खेळ प्रकार रक्कम (लाखांत)
जिम्नॅस्टिक : 15, अ‍ॅथलेटिक्स, शूटिंग : 10, मल्टिजिम, ट्रेडमिल, सायकलिंग : 7, जलतरण, कुस्ती, टेनिस, क्रिकेट : 5, फुटबॉल, हॉकी, बॉक्सिंग, कबड्डी, बास्केटबॉल, ज्युदो, तायक्वांदो, कराटे, वेटलिफ्टिंग व पॉवरलिफ्टिंग : 4, टेनिस , बॅडमिंटन, हँडबॉल, टेबल टेनिस, मल्लखांब, रोप मल्लखांब : 1, व्हॉलीबॉल: 0.75, खो-खो, रस्सीखेच : 0.2