रणजी करंडक क्रिकेट / रणजी करंडक क्रिकेट : महाराष्ट्र विरुद्ध पंजाब तीन गड्यांनी विजयी

प्रतिनिधी

Dec 25,2014 12:21:00 AM IST
पुणे - कर्णधार हरभजन सिंगच्या नेतृत्वाखाली पंजाब संघाने बुधवारी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या ब गटात शानदार विजयाची नोंद केली. या संघाने सामन्यात महाराष्ट्रावर तीन गड्यांनी मात केली.
गुरकिरत सिंग (नाबाद ७३) आणि हरभजन सिंग (५०) यांच्या शानदार अर्धशतकाच्या बळावर पंजाबने सामना जिंकला. महाराष्ट्र संघाने विजयासाठी दिलेले २०४ धावांचे लक्ष्य पंजाबने सात गड्यांच्या मोबदल्यात गाठले. गोलंदाजीत महाराष्ट्र संघाकडून समद फल्लाहने केलेली धारदार गोलंदाजी व्यर्थ ठरली. त्याने १८ षटकांत ६० धावा देत पाच गडी बाद केले. त्यापाठोपाठ श्रीकांत मुंढेने दोन विकेट मिळवल्या. मात्र, त्यांना संघाचा पराभव टाळता आला नाही. आता शानदार विजयासह पंजाबने १५ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले.
मुंबईचा विजय
४० वेळच्या विजेत्या मुंबई संघाने कानपूरच्या मैदानावर उत्तर प्रदेशविरुद्ध आठ गड्यांनी विजय संपादन केला. दोन गड्यांच्या मोबदल्यात मुंबईने विजयाचे ९८ धावांचे लक्ष्य सहज गाठून सामना आपल्या नावे केला. मुंबईचे सहा गुण झाले आहेत.
X