आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्‍ट्रीय रस्सीखेच स्पर्धेत महाराष्‍ट्राला कांस्यपदक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - टग ऑफ वॉर फेडरेशन ऑफ इंडिया व तामिळनाडू टग ऑफ वॉर संघटनेतर्फे कन्याकुमारी येथे आयोजित पहिल्या राष्‍ट्रीय बीच वरिष्ठ गट टग ऑफ वॉर (रस्सीखेच) स्पर्धेत महाराष्‍ट्राच्या संघाने कांस्यपदक पटकावले.


राज्याच्या संघाने मिक्स (महिला-पुरुष) 540 किलो वजन गटात ही कामगिरी साधली. संघाने तिस-या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मणिपूर संघाचा पराभव करून बाजी मारली. संघात मुलांमध्ये उस्मानाबादच्या नितीन गुंडाळे, अतुल मत्ते आणि मुलींमध्ये मयुरी कापसे या तिघांचा समावेश होता. तसेच हर्षवर्धन देशमुख आणि आशिष देशमुख यांनी या राष्‍ट्रीय स्पर्धेत पंच म्हणून काम पाहिले. संघाला आंतरराष्‍ट्रीय प्रशिक्षक श्रीराम निळे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.


राज्याचा विजेता संघ
मुले : अमोल सुरडकर, अक्षय पाटील, नितीन गुंडाळे, अतुल मते, आदित्य ठोंबरे.
मुली : रेश्मा कांबळे, दिव्या चौधरी, मयूरी कापसे, स्नेहल कोरगावकर.