आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra's Narsingh Participating In World Wrestling Competation

जागतिक कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राचा नरसिंग थोपटणार दंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - येत्या 16 सप्टेंबरपासून जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपला प्रारंभ होत आहे. या चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्राचा नरसिंग यादव 74 किलो वजन गटात भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. या स्पर्धे त ऑलिम्पिकपटू सुशीलकुमारचा सहभाग निश्चित नाही. योगेश्वर दत्त दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. ही स्पर्धा 16 ते 22 सप्टेंबरदरम्यान, हंगेरीत होणार आहे. महिला संघात हरियाणाच्या पूजा धांडेला पहिल्यांदा भारतीय संघात स्थान देण्यात आले. गीता फोगटच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष्य असेल. स्पर्धे त भारताचा फ्रीस्टाइल, ग्रीको रोमन पुरुष आणि महिला संघ सभागी होणार आहेत. या स्पर्धेत भारताला ऑलिम्पियन गीता फोगटकडून पदकाची आशा आहे.

‘गतवेळी पात्रता फेरीमुळे नरसिंगला पदक मिळाले नाही. त्याने सर्वांची निराशा केली. मात्र, आता त्याने कसून सराव केला आहे. या वेळी तो देशासाठी पदक नक्की जिंकेल’ असा विश्वास प्रशिक्षक जगमालसिंग यांनी व्यक्त केला.
फ्रीस्टाइल 55 किलो - अमितकुमार, 60 कि.- बजरंग, 66 कि.- अरुणकुमार, 74 कि. - नरसिंग यादव, 84 कि. - पवनकुमार, 96 कि. - सत्यावत कादियन, 120 कि. - हितेंद्र
ग्रीको रोमन 55 किलो - गुरुव शर्मा, 60 कि.- रवींद्रसिंग, 66 कि. - संदीप तुलसी यादव, 74 कि.- राजबीर चिक्कारा, 84 कि.- हरप्रीतसिंग, 96 कि.-हरदीप , 120 कि. - नवीन.
महिला गट 48 किलो - निर्मलादेवी, 51 कि. - विनेश, 55 कि.-पूजा धांडे, 59 कि.-गीता फोगट, 63 कि. - गीतिका जाखर, 67 कि. - नवज्योत कौर, 72 कि.- ज्योती.