आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra's Team Won The Gymnastic Championship

जिम्नॅस्टिक : औरंगाबादला ५ सुवर्ण, ६ रौप्यपदके, राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला विजेतेपद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - येथे झालेल्या १३ व्या राष्ट्रीय एरोबिक्स जिम्नॅस्टिक स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ७ सुवर्ण आणि ६ रौप्यपदके पटकावत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. यात पुण्याच्या मैथिली करंडेने ४ सुवर्ण जिंकून वर्चस्व राखले. सेनादल दुसऱ्या आणि जम्मू-काश्मीर तिसऱ्या स्थानावर राहिले. महाराष्ट्राच्या विजयात औरंगाबादचा मोलाचा वाटा असून ५ सुवर्ण आणि सहाच्या सहा रौप्यपदके जिल्ह्यातील खेळाडूंनी पटकावत आपला दबदबा कायम राखला.
वरिष्ठ गटात सर्वेश भाले, मृगल पेरेने एकेरी आणि मिश्र दुहेरी रौप्य जिंकले. तिहेरीत गौरव जोगदंड, रोहन श्रीरामवार आणि राहुल श्रीरामवार यांनी दुसरा क्रमांक पटकावला. सांघिक गटात गौरव, रोहन, राहुलसह सूरज ताकसांडे आणि विवेक देशपांडेने रौप्यपदक पटकावले. ज्युनियर गटात स्वामिनी मंडलिकने सुवर्ण कामगिरी साधली. तिहेरीत स्वामिनीसह ईशा महाजन व साक्षी लड्डाने रौप्य मिळवले. मिश्र दुहेरीत ऋग्वेद जोशी व शर्वरी लिमये या जोडीने दुसऱ्या क्रमांकावर धडक मारली. बीडच्या खेळाडूंची स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली.
सिल्वी, अमेय, ऐश्वर्याला सुवर्ण
नॅशनल डेव्हलपमेंट गटात १२ वर्षांखालील सिल्वी शहाने उत्कृष्ट कामगिरी करत राज्याला सुवर्ण जिंकून दिले. १४ वर्षांखालील मिश्र दुहेरी गटात अमेय पदातुरे व ऐश्वर्या देशपांडेने सुवर्ण मिळवले. अमेयने पुरुष एकेरी गटातदेखील प्रथम क्रमांक पटकावून सर्वांचे लक्ष वेधले.