आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशी पहिलवानांना ‘चितपट’ करेल ही ‘मराठमोळी’ बॉडीबिल्‍डर, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - बॉडीबिल्डर अश्विनी वासकर )
मुंबई येथे सात ते नऊ डिसेंबर दरम्‍यान होत असलेल्‍या सहाव्‍या ‘वर्ल्ड बॉडी बिल्डिंग अँड फिजीक चॅम्पियनशिप’ या प्रसिध्‍द स्‍पर्धेमध्‍ये महाराष्‍ट्राची कन्‍या अश्विनी वासकर भारताचे प्रतिनिधित्‍व करणार आहे. या स्‍पर्धेमध्‍ये जगभरातून महिला बॉडी बिल्‍डर सहभागी होत आहेत. स्‍पर्धेत देशाचे नाव उंचावण्‍यासाठी अश्विनी कसून सराव करत आहे.
अश्विनी रायगड जिल्‍हातील पेणची असून मत्स्योत्पादन हा तिचा व्‍यवसाय आहे. स्‍वत:ला तंदुरुस्‍त ठेवण्‍यासाठी तिने जिम सुरु केली. त्‍यानंतर त्‍यातच तिला आवड निर्माण झाल्‍याने ती फिटनेस ट्रेनर म्‍हणून काम करायला लागली.
अश्विनीने कित्‍येक बॉडीबिल्डिंग स्‍पर्धेत सहभाग घेतला आहे. आणि आपला मराठी बाणा दाखवून दिला आहे. फेब्रुवारी महिन्यात पुण्याच्या तळेगाव इथे अजित भारत श्री स्पर्धेत अश्विनीने पाचवे स्थान मिळविले. मार्चमध्ये राष्ट्रीय स्तरावर बॉडीपॉवर एक्सपोमध्येही ती पाचवी आली. गेल्या महिन्यात वडोदरा इथे झालेल्या निवड चाचणीनंतर अश्विनीला भारतीय संघात स्थान मिळाले.
पुढील स्‍लाइडवर पाहा, बॉडी बिल्‍डर अश्विनीची काही निवडक छायाचित्रे...