आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा औरंगाबादेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटना व जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 54 वी ‘भारत श्री’ आणि 9 वी राष्ट्रीय महिला अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेचे 21 ते 23 मेदरम्यान संत तुकाराम महाराज नाट्यगृहात आयोजन करण्यात आले. स्पर्धेत 29 राज्यांतील 500 महिला-पुरुष खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती भारतीय शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस डॉ. संजय मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या स्पर्धेतून श्रीलंका येथे 19 जूनदरम्यान होणार्‍या ‘मिस्टर एशिया’ स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड केली जाईल. विशेष म्हणजे पहिल्यांदाच फुकेत (थायलंड) येथे 3 नोव्हेंबरदरम्यान आयोजित ‘एशियन बीच गेम्स’ स्पर्धेसाठी संभाव्य भारतीय संघाची निवड या स्पर्धेतून होईल. पुरुषांच्या सर्व वजनी गटांत स्पर्धा होणार असून गटातील पहिल्या तीन खेळाडूंना पदके आणि पहिल्या पाच खेळाडूंना एकूण 15 लाखांची रोख बक्षिसे देण्यात येणार असल्याचे मोरे म्हणाले. पत्रकार परिषदेस जिल्हा सचिव राजू वरकड उपस्थित होते.
स्पर्धेसाठी 45 लाख खर्च
या स्पर्धेसाठी जवळपास 45 ते 50 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. खेळाडूंना आहारात 2 ते 3 हजार किलो चिकन व 50 हजार अंडी लागेल. तसेच निवासासह 15 लाखांची बक्षीसे असा मोठा खर्च स्पर्धेसाठी लागेल. या स्पर्धेला आर्थिक मदत करण्यासाठी प्रतिष्ठित व्यक्ती, कंपन्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन मोरे यांनी केले.
80 महिला खेळाडू होणार सहभागी
मुलींमध्ये फिटनेसचे महत्त्व वाढावे आणि सशक्त महिला-मुली निर्माण व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटना पुढाकार घेत आहे. महिलांच्या स्पर्धेत 7 राज्यांतील 80 खेळाडूंनी सहभाग निश्चित केला आहे. स्पर्धेत यजमान महाराष्ट्राच्या संघात नाशिक, पुणे, कोल्हापुरातील खेळाडू फिटनेसचे प्रदर्शन करतील.
मुंबईच्या सुहास खामकरचे आकर्षण
स्पर्धेत गत चार वेळेचा ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’ ठरलेला मुंबईचा सुहास खामकर, आशिष साखळकर, महेंद्र पगडे, जालन्याचा किशोर डांगे, पंजाबचा हिरालाल, यूपीचा अमित चौधरी, उत्तराखंडचा अमीत छत्री, केरळचा अनीस राज हे स्पर्धेचे मुख्य आकर्षण असलेले खेळाडू आहेत.